Goa Dairy Dainik Gomantak
गोवा

गोव्यात प्रतिलिटर दुधामागे दोन रुपयांची वाढ

गोवा डेअरी: निर्णयामुळे राज्यातील दूध उत्पादकांना मिळणार दिलासा

दैनिक गोमन्तक

फोंडा: राज्यातील दूध उत्पादकांची शिखर संस्था असलेल्या गोवा डेअरीने दूध उत्पादकांसाठी प्रती लिटर दोन रुपये दरवाढ देण्याचा निर्णय घेतला आहे. यासंबंधीचा ठराव मंजुरीसाठी गोवा राज्य सहकार निबंधकांकडे पाठवण्यात आला आहे. गुढीपाडव्याच्या पार्श्‍वभूमीवर गोवा डेअरीने दूध उत्पादकांसाठी खूशखबर दिली आहे. मात्र, दूध विक्रीतही किमान दोन रुपये दरवाढ करण्याचा गोवा डेअरीचा निर्णय असून हा प्रस्तावही सहकार निबंधकांकडे पाठवण्यात आला आहे.

दूध उत्पादकांना दरवाढ देण्यासंबंधीचा निर्णय घेण्यासाठी आज गुरुवारी बोलावलेल्या बैठकीला गोवा डेअरीच्या प्रशासकीय त्रिसदस्यीय समितीचे अध्यक्ष डॉ. आगुस्तिन मिस्किता तसेच यशवंत कामत व अवित नाईक हे सदस्य व गोवा डेअरीच्या व्यवस्थापकीय संचालक पदाचा भार सांभाळणारे विशेष अधिकारी काशी नाईक आदी उपस्थित होते.

दरम्यान, गोवा डेअरीशी संबंधित दूध उत्पादकांना अठरा महिन्यांपूर्वी दरवाढ दिली होती. पण सध्याची स्थिती पाहता दूध उत्पादकांना दरवाढ देणे आवश्‍यक होते, त्यामुळेच दरवाढीचा प्रस्ताव प्रशासकीय समितीसमोर आला असता तो त्वरित मंजूर करण्यात आला. आता सहकार निबंधकांच्या होकाराची तेवढी वाट पहावी लागेल, असे गोवा डेअरीच्या सूत्रांनी सांगितले. दूध उत्पादकांना दरवाढ देण्याच्या निर्णयाचे दूध उत्पादकांनी स्वागतच केले आहे.

आमसभा 27 एप्रिलला

गोवा डेअरीची आमसभा येत्या 30 एप्रिलपूर्वी घेणे आवश्‍यक होते. त्यामुळे ही आमसभा येत्या 27 एप्रिलला घेण्याचे निश्‍चित करण्यात आले. ही आमसभा कुर्टी येथील राज्य सरकारच्या सहकार भवनात सकाळी घेण्यात येईल.

16 एप्रिलपासून दरवाढ

सहकार निबंधकांकडे गोवा डेअरीच्या दूध उत्पादकांना दरवाढ देण्याचा ठराव पाठवला आहे. मंजुरीनंतर येत्या 16 एप्रिलपासून लीटरमागे दोन रुपयांची ही दरवाढ दूध उत्पादकांसाठी लागू करण्यात येईल. दूध विक्रीतही किमान दोन रुपयांची दरवाढ 16 एप्रिलपासूनच लागू होण्याची शक्यता व्यक्त करण्यात येत आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Baina Beach: बायणा किनारा 30 वर्षांसाठी भाड्याने देण्याचा प्रस्ताव रद्द; स्थानिकांच्या विरोधाला यश

भारतासाठी टेन्शन फ्री बातमी! डोनाल्ड ट्रम्प यांनी रशियन तेल खरेदीवरील कडक निर्बंध हटवले; 100 टक्के टॅरिफचा धोका टळला

Smart Meter Scheme: स्मार्ट वीज मीटरवर मानवाधिकार आयोगाचा हिरवा कंदील; तरी गोव्यात योजना तूर्तास स्थगितच

Horoscope: नवरात्रीच्या सातव्या दिवशी देवी कालरात्रीची कृपा! मेष ते मीन, 12 राशींचे आजचे राशिभविष्य; कोणाला मिळणार धनलाभ?

Diwali Bonus for Central Govt Employees: केंद्रीय कर्मचाऱ्यांना दिवाळीची मोठी भेट! मोदी सरकारकडून बोनस जाहीर; खात्यात येणार 'इतके' पैसे

SCROLL FOR NEXT