Panaji Dainik Gomantak
गोवा

Panaji News : रोहन हरमलकर ‘मगो’त दाखल,पक्षाची ताकद वाढली

Panaji News : मगो पक्षाच्या केंद्रीय कार्यकारिणीचे खजिनदार अनंत नाईक तसेच इतर पदाधिकारी उपस्थित होते. सुदिन ढवळीकर यांनी पुष्पगुच्छ भेट देऊन रोहन हरमलकर यांचे पक्षात प्रवेश करीत असल्याबद्दल स्वागत केले.

गोमन्तक डिजिटल टीम

Panaji News :

पणजी, राज्यातील उत्तर आणि दक्षिण अशा दोन्ही मतदारसंघात यावेळेला भाजप उमेदवारच निवडून येणार असून मगो पक्षाने या दोन्ही उमेदवारांना पाठिंबा दिल्याने मतांची टक्केवारी निश्‍चितच वाढेल, असा दावा करताना कुंभारजुवे मतदारसंघातील गेल्या विधानसभा निवडणुकीतील उमेदवार रोहन हरमलकर यांना मगो पक्षात प्रवेश दिल्याचे वीजमंत्री सुदिन ढवळीकर यांनी रविवारी पत्रकारांशी बोलताना जाहीर केले.

मगो पक्षाच्या केंद्रीय कार्यकारिणीचे खजिनदार अनंत नाईक तसेच इतर पदाधिकारी उपस्थित होते. सुदिन ढवळीकर यांनी पुष्पगुच्छ भेट देऊन रोहन हरमलकर यांचे पक्षात प्रवेश करीत असल्याबद्दल स्वागत केले. ढवळीकर म्हणाले, या निवडणुकीत मगो पक्षात अनेक कार्यकर्त्यांना प्रवेश देण्यात आला आहे.

कुंभारजुवे मतदारसंघात गेल्या विधानसभा निवडणुकीत उल्लेखनीय मते मिळवलेले रोहन हरमलकर यांना मगो पक्षात प्रवेश दिला असून अशा अनेकजणांच्या प्रवेशामुळे मगो पक्षाची ताकद निश्‍चितच वाढली.

मगो पक्षाच्या कार्यकर्त्यांना भाजपला मतदान करण्यास सहाय्यभूत ठरा असे सांगण्यात आले असून मतदारांशी संपर्कही साधण्यात आला आहे, असे ढवळीकर म्हणाले.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Kalidasa Pride Story: महाकवी कालिदासाचा गर्व उतरला, आजच्या साहित्यिकांचा कधी? पुरस्कार, सत्कार अन् अहंकारावर परखड भाष्य

PM Kisan 24th Installment: दिवाळीपूर्वी शेतकऱ्यांना मोठं गिफ्ट? पीएम किसानचा 24वा हप्ता 'या' दिवशी जमा होणार; पाहा काय आहे अपडेट

VIDEO: समुद्रात तरंगू लागले आयफोन अन् लक्झरी परफ्यूमचे बॉक्सेस! होर्मुझ सामुद्रधुनीत भीषण अपघात; जहाजावरील 21 जणांचा जीव थोडक्यात वाचला

DA Hike: कॅबिनेट बैठकीत DA बाबत मौन! केंद्रीय कर्मचाऱ्यांना आता दिवाळीची प्रतीक्षा; महागाई भत्त्यावर अजूनही सस्पेन्स कायम

Pakistan School Tragedy: निष्पाप चिमुकल्यांचा टाहो! पाकिस्तानात शाळेचे छत कोसळून 20 हून अधिक मुलांचा मृत्यू; हॉस्पिटलबाहेर पालकांचा हंबरडा

SCROLL FOR NEXT