Goa Theft Dainik Gomantak
गोवा

Goa Theft: मडगावात चाकू-हातोड्याचा धाक दाखवत लूट, पोलिसांकडून चौघांना अटक

Margaon: मालभाट-मडगाव येथे चाकूचा धाक दाखवत व हातोड्याने मारहाण करत मोबाईल, एअर बर्ड्स आणि रोख रक्कम असा सुमारे १२ हजार रुपयांचा मुद्देमाल लुटल्याची घटना समोर आली आहे.

Sameer Amunekar

मडगाव: मालभाट येथून एक धक्कादायक प्रकार समोर आला आहे. एका तरूणाला चाकूचा धाक दाखवत व हातोड्याने मारहाण करत मोबाईल, एअर बर्ड्स आणि रोख रक्कम असा सुमारे १२ हजार रुपयांचा मुद्देमाल लुटल्याची घटना समोर आली. या प्रकरणात मडगाव पोलिसांनी चौघांना अटक केली असून, त्यांना पाच दिवसांची पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, अटक करण्यात आलेल्या आरोपींची नावे अस्लम शेख, दीपक सहानी, आफताब खान आणि आकाश बोटे अशी आहेत. ही घटना शुक्रवारी ९ मे रोजी सकाळच्या सुमारास सोनू तिर्की या तरूणासोबत घडली.

हा तरुण शाही दरबार हॉटेलमध्ये काम करतो. तो आपल्या मित्राला रेल्वे स्थानकावर सोडून परतत असताना मालभाट परिसरात त्याला अडवून चाकूचा धाक दाखवण्यात आला आणि त्याच्यावर हातोड्याने हल्ला करण्यात आला.

या हल्ल्यानंतर आरोपींनी त्याच्याकडील रेडमी कंपनीचा मोबाईल, एअर बर्ड्स आणि ४०० रुपये रोख असा एकूण १२ हजार ४०० रुपयांचा मुद्देमाल हिसकावून पळ काढला. घडलेल्या प्रकारानंतर सोनू तिर्कीने मडगाव पोलीस स्थानकात तक्रार दाखल केली.

पोलीस निरीक्षक सूरज सामंत यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक समीर गावकर यांनी कारवाई करत चारही आरोपींना ताब्यात घेतलं. अटकेनंतर त्यांना न्यायालयात हजर करण्यात आले असता, न्यायालयानं त्यांना ५ दिवसांची पोलीस कोठडी सुनावली.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa vs Oman: अभिनव, शिवेंद्र, कौशिक विजयाचे शिल्पकार; आंतरराष्ट्रीय खेळाडू असलेल्या ओमान संघावर 6 विकेट्सनी मात

14 राज्ये, 80 पेक्षा जास्त एफआयआर अन् 200 हून अधिकांना बेड्या! ISIच्या शहजाद भट्टी नेटवर्कचा पर्दाफाश; भारतीय सुरक्षा यंत्रणांची मोठी कारवाई

Margao Vegetable Vendors: महिला भाजी विक्रेत्यांना मडगावात जागा उपलब्ध करणार; दिगंबर कामत

Navpancham Yog 2026: आर्थिक भरभराट अन् नोकरीत प्रमोशन! 4 राशींसाठी 'नवपंचम योग' ठरणार जॅकपॉट; करिअरला मिळणार रॉकेटसारखी गती

Goa Rooftop Solar Scheme: छतावर सोलर लावा अन् मिळवा 2.20 लाखांपर्यंत अनुदान; गोव्यात नवी योजना लागू

SCROLL FOR NEXT