Goa Road Condition Dainik Gomantak
गोवा

Ponda Road Condition| फोंड्यातील रस्त्यांची दुरुस्ती सुरू!

दैनिक गोमन्तक

फोंड्यातील तीन प्रकल्पांच्या कामामुळे खराब झालेल्या रस्त्यांवरील खड्ड्यांत सिमेंटचा थर देऊन हे खड्डे बुजवण्याचा प्रयत्न प्रशासनाने चालवला आहे. मात्र सगळे खड्डे बुजवणे शक्य नसल्याने चतुर्थीनंतर सर्व रस्त्यांचे हॉटमिक्स डांबरीकरण करावे, अशी जोरदार मागणी फोंडावासीयांनी केली आहे.

फोंडा तालुक्यातील सर्वच मतदारसंघातील रस्त्यांवर खड्डे पडले आहेत. फोंडा शहर परिसराबरोबरच कुर्टी भागातील रस्त्यांवर तर हे खड्डे जागोजागी पडल्याने वाहनचालकांना वाहन चालवताना मोठी अडचण होत असून खराब रस्त्यांमुळे दुचाकीस्वारांना मणक्याचे आजार जडल्याच्या घटना आहेत, त्यातच या खराब रस्त्यांमुळे वाहने नादुरुस्त होण्याचे प्रकारही घडत असल्याने नियोजित प्रकल्पांचे काम त्वरित पूर्ण करून रस्त्यांचे हॉटमिक्स डांबरीकरण करण्याची मागणी होत आहे.

फोंड्यातील रस्ते सुधारणार कधी हा सवाल अजूनही अनुत्तरित आहे. प्रकल्पांसाठी रस्त्यांचे खोदकाम केले जाते, मात्र खणलेले रस्ते पुन्हा पूर्वपदावर आणण्यासाठी संबंधित खात्याकडून वेळकाढू धोरण अवलंबले जात असल्याने वाहनचालकांना सध्या नको ते रस्ते अशी स्थिती झाली आहे.

- विराज सप्रे, फोंडा

फोंडा तालुक्यातील विविध प्रकल्पांमुळे रस्त्यांची स्थिती दयनीय झाली आहे. प्रकल्प हवेच, पण असे प्रकल्प उभारताना त्यासाठी उद््भवणाऱ्या समस्यांचेही निराकरण वेळीच व्हायला हवे, त्यामुळे चतुर्थीनंतर रस्त्यांचे हॉटमिक्स डांबरीकरण व्हावे, हीच अपेक्षा.

- रामदास तुकाराम हळदणकर, शांतीनगर - फोंडा

वीजवाहिन्यांसाठी रस्ते खोदले!

फोंडा तालुक्यात सध्या भूमिगत वीजवाहिन्या टाकण्याचे काम जोरात आहे. या वाहिन्या टाकण्यासाठी जागोजागी रस्ते खोदण्यात आले, त्यामुळे खराब रस्त्यावरून वाहतूक करणे मुश्‍किलीचे ठरले आहे. कवळे भागात तर खराब रस्त्यामुळे अपघात झाल्याच्या घटना आहेत. मात्र सध्या हे खड्डे सिमेंटचा वापर करून बुजवण्याचे काम सुरू करण्यात आले आहे, त्यामुळे काही अंशी वाहनचालकांना दिलासा मिळाला आहे.

मलनिस्सारणाचे काम सुरूच

फोंडा भागात मलनिस्सारण प्रकल्पाचे काम अजूनही सुरूच आहे. ढवळी-कवळे येथे मलनिस्सारण प्रक्रिया प्रकल्प कार्यान्वित झाला तरी अजूनही वाहिन्या टाकण्याचे काम सुरूच आहे. त्यामुळे हे काम त्वरित पूर्ण करून आवश्‍यक त्या ठिकाणी लवकर जोडण्या द्याव्यात, अशी मागणी होत आहे.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

St. Francis Xavier DNA Test Row: वेलिंगकरांविरोधात रस्त्यावर उतरलेल्या आंदोलकांची माघार! राजकीय मायलेजचा मुद्दा नडला

Leopard Trapped at Pissurlem: ..अखेर बिबट्या जेरबंद! पिसुर्ले ग्रामस्थांनी सोडला सुटकेचा नि:श्वास

CM Pramod Sawant: पोल्ट्री उद्योगातून 'स्वयंपूर्ण गोवा' करण्यासाठी सरकार करणार मदत

Viral Video : ‘तो’ व्हिडिओ गोव्याचा नव्हे, कांगोचा

शाळकरी मुलांच्या बाबतीत आपण किती जागरूक, शिक्षित आणि गंभीर आहोत?

SCROLL FOR NEXT