इस्‍कॉन : बोरी गावात वादळापूर्वीची शांतता!

रस्‍त्‍याचे काम वेगात : मात्र आंदोलक शांत
Bori News
Bori NewsDainik Gomantak

ISKCON Temple Goa: इस्कॉनचा बहुउद्देशीय प्रकल्प माटीर-बोरीच्‍या डोंगरमाथ्यावर होऊ घातला आहे. हा प्रकल्प व्हावा म्हणणारे मूग गिळून गप्प आहेत तर काही पर्यावरणप्रेमी तसेच मोजकेच लोक त्यास विरोध दर्शवत आहेत.

Bori News
Vegetables Price In Goa: चतुर्थीच्या तोंडावर भाज्‍या महागणार!

अलीकडेच या प्रकल्पाकडे जाण्यासाठी रस्ता बनविण्याचे काम सुरू असताना ठेकेदाराच्या कामगारांना पोलिसांनी गजाआड केले होते. त्‍यानंतर आंदोलकांच्या म्होरक्यांनाही पोलिसांनी तंबी दिल्यावर वातावरण थंड झाले.

सध्‍या या रस्त्याचे काम जोरात आणि तणावाशिवाय सुरू असल्याचे दिसून येत आहे. परंतु पुन्‍हा कधीही तणाव निर्माण होऊ शकतो, अशी स्‍थिती आहे. माटीर-बोरी येथील जमीनदार अच्‍च्‍युत सावकर यांनी सुमारे २५ वर्षांपूर्वी आपली जमीन मडगाव येथील आपला नातू भालचंद्र बखले यांना दिली होती.

Bori News
Babush Monserrat Rape Case: पीडितेच्‍या फेरसाक्षीच्‍या अर्जावर उद्या युक्तिवाद

ही जमीन भालचंद्र बखले यांनी इस्कॉनचा बहुउद्देशीय प्रकल्प बोरी गावात व्हावा म्हणून इस्कॉनला मोफत दिली. या प्रकल्पाकडे जाणाऱ्यासाठीचा रस्ता बोरी कोमुनिदादच्या जमिनीतून जातो.

त्‍यासाठीचे सर्व सोपस्कार पूर्ण करून बोरी ग्रामपंचायतीकडे फाईल पाठवण्यात आली. त्यावेळच्या पंचायत मंडळाने काही काळ या रस्त्याची फाईल अडवून ठेवली. परंतु इस्कॉनच्या ती पंचायत उपसंचालकाकडे पाठविली.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com