Road
Road  Dainik Gomantak
गोवा

गोवा मुक्तीनंतरही रस्त्यासाठी नागरिकांची होतेय परवड!

दैनिक गोमन्तक

शिवोली: मार्ना-शिवोली पंचायत क्षेत्रातील केरीवाडी-शिवोली येथील पारंपरिक पायवाटवजा रस्त्याचे गोवा मुक्तीनंतरच्या 60 व्या वर्षीही डांबरीकरण झालेले नाही. सध्या पावसामुळे येथे दलदल निर्माण झाली असून या भागातील सुमारे वीस कुटुंबांची मोठी गैरसोय होत आहे. पोर्तुगीज काळापासून या भागात राहाणाऱ्या स्थानिक रहिवाशांना या भागात साचलेले पावसाचे पाणी तसेच निर्माण झालेल्या दलदलीतूनच जाणे-येणे करावे लागते.

(Road problem in Shivoli Panchayat area)

विशेषत: विद्यार्थ्यांना या खराब रस्त्याचा अधिक त्रास होत असल्याचे ग्रामस्थ किशोर कळंगुटकर व इतर रहिवाशांनी सांगितले.

पंचायत सदस्यांचे अक्षम्य दुर्लक्ष

माजी सरपंच फेर्मिना सिल्वेस्टर फर्नांडिस यांनी या प्रभागाचे मागच्या पंचायत मंडळावर प्रतिनिधित्व केले आहे, तसेच त्यांचे पती सिल्वेस्टर हेही याच प्रभागातून तीनवेळा पंचायतीवर निवडून गेले आहेत. मात्र वारंवार सांगूनही येथील समस्यांकडे कुणी लक्ष दिले नसल्याचे किशोर कळंगुटकर तसेच अन्य ग्रामस्थांनी सांगितले.

लवकर प्रश्‍न सोडवा

गेली साठ वर्षे येथील समस्यांकडे कुणीच लक्ष दिलेले नाही. दहा ऑगस्टपूर्वी येथील समस्या दूर न केल्यास पंचायत निवडणुकांवर बहिष्कार घालण्याचा निर्धार रहिवाशांनी केल्याचे जितेंद्र गोलतेकर, किशोर कळंगुटकर यांनी सांगितले.

किल्ला रस्ताही धोकादायक

मुख्य चर्च असलेल्या सेंट ॲन्थनी चर्च जंक्शनकडून प्रसिद्ध शापोरा किल्ल्याकडे गेलेला जुना चिंचोळा रस्ता दिवसेंदिवस वाहतुकीस धोकादायक बनत चालला आहे. या भागातील शापोरा जेटी तसेच किल्ल्याकडे जाण्यासाठी पर्यटक नेहमीच या रस्त्याचा वापर करतात. मात्र, रस्त्यावरील खड्डे तसेच स्थानिका़ंची घरे यांमुळे हा रस्ता वाहतुकीस धोकादायक बनत चालला आहे.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa Police: 25 लाखांची सोन्याची बिस्किटे घेवून झाला फरार; पश्चिम बंगालमधून चोरट्याला अटक!

IndiGo Future Plan: इंडिगोचा मेगा प्लॅन, 100 छोटी विमाने ऑर्डर करण्याची एअरलाइन्सची तयारी

Dhargal Hit And Run Case: धारगळमध्ये तो अपघात नव्हे खूनच! उत्तर प्रदेशच्या दोघांना अटक

Lost From Beach: गोव्यात विविध बीचवरुन पाच मुले बेपत्ता; 'दृष्टी'ने घडवली कुटुंबियांशी पुन्हा भेट

Margao Session Court: वेश्याव्यवसायासाठी महिलांची खरेदी आणि पुरवठा केल्याप्रकरणी एकजण दोषी

SCROLL FOR NEXT