पणजी: गोव्यातील काँग्रेसचा एक गट भाजपात जाणार असल्याची चर्चा रविवारी दिवसभर रंगली. काँग्रेस नेत्यांचे राजकीय नाट्य जनतेने टीव्हीवर पाहिले. जनतेने या राजकीय उलथापालथीवर समाजमाध्यमातून आपल्या संतप्त प्रतिक्रीया व्यक्त केल्या. राजकारणात काहीही घडले की समाजमाध्यमावर ते काही क्षणात व्हायरल होते.
(Congress leader trolls from netizens in goa)
लोक नेत्यांबाबत आपली मते मांडू लागतात. त्याचे ‘मिम्स’ तयार केले जाते आणि ते सर्वांपर्यंत पोहचते. रविवारी गोव्यातील राजकीय नाट्याचे असे मीम्स बरेच व्हायरल झाले. अनेकांनी फेसबुक, ट्विटरच्या माध्यमातून संताप व्यक्त केला.
‘बांबोळीच्या खुर्साचो सोपुत, बोडगेश्वर देवाचो सोपुत, पणजी महालक्ष्मीचो सोपूत
हेवटेन आणि तेवटेन वतना, देवाक आणि देवचाराक तरी भियात मरे... अशी एक प्रतिक्रीया एका नेटकऱ्याने व्यक्त केली असून त्यावर हजारो लोकांनी प्रतिसाद दिला असून काँग्रेसच्या फुटीरांना धारेवर धरले आहे. त्यांना पुन्हा निवडणुकीत जागा दाखविण्याचा निर्धार केला आहे. देवाची शपथ घेणाऱ्यांना देव कधीच माफ करणार नाही, असेही उत्तर एका नेटकऱ्याने दिले.
इधर चला मै... उधर चला..!
ऋतिक रोशनच्या ‘कोइ मील गया’ या चित्रपटातील हे गाणे. या गाण्यावर एक मिम्स तयार करण्यात आली असून, त्यात मडगावचे आमदार दिंगबर कामत हे दिसत आहेत. दिंगबर कामत हे कॉंग्रेसमधून भाजपात जाणार असल्याने त्यांच्यावर तयारी केलेली ही मिम्स बरीच व्हायरल झाली. ती हजारो लोकांनी शेअरही केली.
भटजीबुवांचे ‘ते’ गाऱ्हाणे
पणजीच्या महालक्षमी मंदिरात काँग्रेस नेत्यांना एका भटजीबुवांनी पाच वर्षे एकनिष्ठतेची शपथ दिली होती. त्यावेळी सर्वांनी नतमस्तक होऊन शपथ घेतली. हा या घटनेचा व्हिडिओ आता समाजमाध्यमावर व्हायरला झाला. पक्ष सोडणार नाही, असे यात म्हटले होते. मात्र, राजकारण्यांचा कधी काहीच भरवसा नसतो, हे पुन्हा सिद्ध झाले त्यामुळे व्हिडियोच्या शेवटी विनोदवीर जॉनी लिव्हर म्हणतो, ‘‘मै इसकी गॅरंटी नही ले सकता...’’
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.