Vasco Road Construction Dainik Gomantak
गोवा

निज गोयकार फौजेकडून रस्त्याचं डांबरीकरण

वास्कोत माता सेकंडरी हायस्कूलजवळील झाडेझुडपे साफ करुन रस्त्याचं बांधकाम

दैनिक गोमन्तक

वास्को : निज गोयकार फौज या बिगर सरकारी संस्थेने सिटिझन ऑफ पाट्रांग बायणा प्रभाग १२ च्या युवकांच्या सहकार्याने माता सेकंडरी हायस्कूल जवळील झाडेझुडपे साफ करून रस्त्याचे डांबरीकरण केल्याने येथील नागरिकांनी त्यांचे अभिनंदन करून आभार व्यक्त केले. (Vasco News Updates)

बायणा वास्को (Vasco) येथील एम पी टी मैदानाजवळील माता सेकंडरी हायस्कूलकडे जाणारा रस्ता गेल्या कित्येक वर्षापासून खड्डेमय झाला होता. मात्र या रस्त्याकडे स्थानिक प्रतिनिधींनी ढुंकून सुद्धा पाहिले नव्हते. पावसाळ्यात तर या रस्त्यावर तळ्याचे स्वरूप होऊन त्या पाण्यातून शालेय मुलांना शिक्षकांना तसेच या रस्त्यावरून येणार्‍या जाणार्‍या लोकांना वाट काढावी लागत असे. तसेच पावसाचे पाणी शाळेत (School) जाऊन सगळी घाण शाळेत भरत असे. तसेच संपूर्ण शाळा परिसर माता सेकंडरी स्कूल ते मैदान बाजूचा रस्ता परिसर झाडाझुडपांनी व्यापलेला होता. त्यामुळे या रस्त्यावरून दिवसाढवळ्या तसेच रात्रीच्या वेळी ये-जा करणाऱ्या शेकडो नागरिकांना जोखमीचे होते. कारण किती वेळा या मार्गावर महिलांच्या हातातील पर्स पळविणे, मंगळसूत्र हिसकावून घेणे असे प्रकार घडले होते. तसेच या झुडपामुळे शालेय विद्यार्थ्यांना भयावह होते.

दरम्यान निज गोंयकार फौज या बिगर सरकारी संस्थेतर्फे बुलडोजर घालून या परिसरातील झाडे झुडपे कापून हा परिसर साफ केला. त्यामुळे या रस्त्यावरून (Road) येणाऱ्या जाणाऱ्या लोकांनी खास करून महिलांनी सुटकेचा श्वास सोडला. कारण रात्रीच्या अंधारात या रस्त्यावरून जाणे जोखमीचे होते. तसेच येथील मेटाकुटीस आलेल्या रस्त्याचीही डागडुजी करून त्याचे डांबरीकरण करण्यात आले. याकामी त्यांना सिटीजन ऑफ पाट्राँग बायणा प्रभाग 12 च्या युवकांचे सहकार्य लाभले. यांच्या या सहकार्याबद्दल शालेय व्यवस्थापन तसेच नागरिकांनी आभार व्यक्त केले.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Viral Bike Stunt Video: काळजाचं पाणी करणारा थरारक स्टंट! पठ्ठ्याचा डोकं चक्रावणारा व्हिडिओ व्हायरल; जीवाची लावली बाजी

Shani Gochar 2026: शनिदेव देणार 5 राशींना श्रीमंतीचं वरदान! हाती लागणार कुबेराचा खजिना; करिअरला मिळणार नवा बूस्ट

Colvale Jail Employee Stress: अभद्र युतीमुळे प्रामाणिक कर्मचाऱ्यांचा गुदमरतोय जीव! सुधारगृह गुन्हेगारांचा अड्डा; मानसिक आरोग्य कक्ष व छळविरोधी समित्यांची तातडीची मागणी

Crime News: आधी विषारी कोल्ड्रिंक पाजले, मग गळा आवळून केला खून! 20 वर्षांच्या संसारानंतर बायकोनेच नवऱ्याचा काढला काटा; कारण ऐकून व्हाल अवाक

Jitesh Kamat Colvale Jai: कोलवाळ मध्यवर्ती कारागृहाची सद्यस्थिती पाहता, 'गुन्हेगारांना आलिशान सुविधा पुरवणारे हॉलिडे होम' - जितेश कामत

SCROLL FOR NEXT