Goa Politics: कॉंग्रेसमधील मतभेद चव्हाट्यावर!

‘आप’ची प्रचारात आघाडी: कॉंग्रेसला अंतर्गत दुहीचे आव्हान
Goa Congress
Goa CongressDainik Gomantak
Published on
Updated on

चर्चिल आलेमाव हे सासष्टीतील एक बडे हेवीवेट राजकारणी म्हणून ओळखले जातात. असे असले तरी त्यांची धरसोडवृत्ती त्यांच्या बऱ्याचदा अंगाशी आली आहे. युनायटेड गोवन्स डेमोक्रेटिक पार्टी (युगोडेपा) कॉंग्रेस, सेव्ह गोवा, राष्ट्रवादी कॉंग्रेस असा त्यांचा आतापर्यंतचा प्रवास असून आता ते तृणमूल कॉंग्रेसच्या छावणीत दाखल झाले आहेत. तसे पाहायला गेल्यास तृणमूल कॉंग्रेसही त्यांना नवीन नाही. 2014 साली त्यांनी तृणमूलच्या TMC उमेदवारीवर लोकसभा निवडणूक लढविली होती. आणि त्यावेळी त्यांना आपली अनामत रक्कमही वाचवता आली नव्हती. पाच वेळा आमदार, एकवेळा खासदार अशी त्यांची कारकीर्द असली तरी त्यात स्थैर्य असे कोठेच दिसत नाही. (Disagreements within Goa Congress surfaced)

Goa Congress
तुल्यबळ लढतींसाठी भाजपची व्यूहरचना

1990 साली पुरोगामी लोकशाही आघाडी (पुलोआ) चे सरकार असताना चर्चिल यांना अल्पकाळ का होईना, पण मुख्यमंत्रिपद भूषवायला मिळाले होते. बाणावली व नावेली या मतदारसंघावर असलेले त्यांचे वर्चस्व कोणच नाकारू शकत नाही.

2017 मध्ये ते राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या Goa Congress उमेदवारीवर बाणावलीतून निवडून आले होते. खरे तर राष्ट्रवादी पेक्षा त्यांची वैयक्तिक शक्तीच त्यांना जिंकण्यास कारणीभूत ठरली होती. राष्ट्रवादीचे आमदार असून व महाराष्ट्रात राष्ट्रवादी व कॉंग्रेसची युती असूनही चर्चिल मात्र भाजपचीच ‘भलावण’ करीत राहिले. सुरुवातीला मनोहर पर्रीकर व नंतर डॉ. प्रमोद सावंत यांना अप्रत्यक्षरित्या पाठिंबा देत राहिले.

एक विरोधी आमदार म्हणून भूमिका बजावण्यात चर्चिल Churchill Alemao कमी पडले हे तेवढेच खरे आहे. आता त्यांनी आपण बाणावलीत व मुलगी वालांका नावेलीत, अशी सोय केली असून दोघेही तृणमूलच्या झेंड्याखाली ही निवडणूक लढविणार आहेत. असे असले तरी बाणावलीचे वातावरण यावेळी चर्चिल यांना अनुकूल आहे,असे बिलकुल दिसत नाही. तेथे आपचे कॅप्टन व्हेंजी व्हीएगस यांनी प्रचारात बरीच आघाडी घेतली असून त्यांनी मतदारांना आकर्षित करायला सुरुवात केली आहे. त्यांच्या मागे युवकांची फौजही दिसते आहे. तसे पाहता बाणावलीत तृणमूलची, अशी राजकीय शक्ती नाहीच. त्यामुळे पुन्हा एकदा चर्चिल यांना वैयक्तिक करिष्म्यावर ही निवडणूक लढवावी लागत आहे. पण मतदारांचा म्हणावा तसा प्रतिसाद मिळत नसल्यामुळे चर्चिल यांनी आता ही आपली शेवटची निवडणूक असल्यामुळे आपल्याला एक संधी द्या, अशी भावनिक साद घालायला सुरुवात केली आहे. त्याला मतदार किती प्रतिसाद देतात, हे बघावे लागेल.

Goa Congress
गोव्यात 7 ट्रान्सजेंडरना मिळाले मतदार कार्ड, 40 वर्षांचा ट्रान्सजेंडर म्हणाला...

भाजपतर्फे बाणावलीतून प्रथमच उमेदवार रिंगणात उतरविला असून ही उमेदवारी

दामोदर बांदोडकर यांना प्राप्त झाली आहे. यापूर्वी भाजप एकतर अपक्ष उमेदवारांना पाठिंबा देत,असे किंवा तटस्थ राहत असे. पण आता कॅथलिकांची मते विभागली जाऊन आपल्या हिंदू उमेदवाराला संधी मिळेल ,असे वाटत असल्यामुळे त्यांनी हा जुगार खेळल्याचे दिसत आहे.

यात त्यांना यश येते की नाही हे बघावे लागेल. पण सध्या ही निवडणूक म्हणजे चर्चिल आलेमाव यांच्या दृष्टीने प्रतिष्ठेची बाब ठरली असून ते यात यशस्वी होतात की नाही, याचे अवलोकन करावे लागेल, त्याचबरोबर राष्ट्रवादीतर्फे रिंगणात उतरणारे माजी मंत्री मिकी पुन्हा आपले गतवैभव प्राप्त करतात की नाही, यावरही लक्ष ठेवावे लागेल. एकंदरीत ही निवडणूक चर्चिल व मिकी यांच्यातला संघर्षाचा शेवटचा अंक ठरू शकतो. आता खरंच हा शेवटचा अंक ठरतो की काय चर्चिलांची ‘नाव’ किनाऱ्याला लागते की काय याचे उत्तर येणाऱ्या दिवसात मिळणार हे निश्चित.

कॉंग्रेसमधील मतभेद चव्हाट्यावर !

यामुळे कॉग्रेस आता ‘बॅकफुट’ वर गेली असून एकेकाळी कॉंग्रेसचा हा बालेकिल्ला असलेला मतदारसंघ कॉंग्रेसच्या हातातून निसटतो, की काय असे वाटायला लागले आहे. कॉंग्रेसने बाणावलीची उमेदवारी टोनी डायस यांना दिल्यामुळे अनेक कार्यकर्ते खवळले असून ही उमेदवारी तीस लाख रुपयांना विकली असल्याचा आरोप कॉंग्रेस दक्षिण गोवा जिल्हा समितीच्या सरचिटणीस जिना परेरा यांनी केला आहे. यातून कॉंग्रेसमधली अंतर्गत दुही चव्हाटयावर आली आहे.

पुन्हा चर्चिल-मिकी आमनेसामने

कॉंग्रेस मध्ये सुध्दा ‘आलबेल’ दिसत नाही. अनपेक्षितपणे शेवटच्याक्षणी कॉंग्रेसने तियात्रिस्त टोनी डायस यांना उमदेवारी दिल्यामुळे कॉंग्रेसचे कार्यकर्ते नाराज झाले आहेत. माजी मंत्री मिकी पाशेको हे कॉंग्रेस उमेदवारीच्या शर्यतीत होते. त्यांनी आता कॉंग्रेस त्यागून राष्ट्रवादीचा आसरा घेतला आहे. पाशेको यांची ही उमेदवारी आलेमाव यांच्या डोकेदुखीत भर घालू शकते. मागे 2002 साली मिकी पाशेकोंनीच चर्चिल यांना पराभूत केले होते. ही आठवण त्यामुळे ताजी झाली आहे.

मिलिंद म्हाडगुत

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com