Ro-Ro Service Dainik Gomantak
गोवा

Ro Ro Ferry Sapendra Divar : सापेंद्र-दिवाडी जलमार्गावर होणार 2 रो-रो फेरीबोटी! बेती-पणजी मार्गावरही मोठ्या आकाराची फेरीबोट

Ro Ro Ferry Boat Sapendra Divar : बेती-पणजी जलमार्गावर मोठ्या आकाराच्या नव्या फेरीबोट सेवाही सुरू होणार आहे, अशी माहिती नदीपरिवहनमंत्री सुभाष फळदेसाई यांनी लेखी उत्तराद्वारे दिली आहे.

गोमन्तक डिजिटल टीम

पणजी: नदी परिवहन खात्यातर्फे रायबंदर-चोडण जलमार्गावर सुरू करण्यात आलेल्या रो-रो फेरीबोट सेवेला जवळपास एक वर्ष पूर्ण होत असताना, आता खात्याने नव्या दोन रो-रो फेरीबोटी सापेंद्र-दिवाडी या जलमार्गावर सुरू करण्‍याचा निर्णय घेतला आहे.

फेब्रुवारी अखेरपर्यंत या फेरीबोटी सेवेत रुजू होतील. बेती-पणजी जलमार्गावर मोठ्या आकाराच्या नव्या फेरीबोट सेवाही सुरू होणार आहे, अशी माहिती नदीपरिवहनमंत्री सुभाष फळदेसाई यांनी लेखी उत्तराद्वारे दिली आहे. आमदार राजेश फळदेसाई यांनी विधानसभेत याबाबत प्रश्‍‍न विचारला होता.

जुलै २०२६ पर्यंत तीन जुन्या फेरीबोट बदलण्यात येणार आहेत. जुने गोवे-दिवाडी आणि बेती येथील फेरीबोट रॅम्पच्या दुरुस्तीचे काम सार्वजनिक बांधकाम खात्यामार्फत पूर्ण केले आहे. तसेच नार्वे-दिवाडी या जलमार्गावरील रॅम्पचे काम साबांखा कंपनीकडून मार्च २०२६ पर्यंत पूर्ण करण्यात येणार आहे.

अंतर्गत जलवाहतुकीसाठी आवश्यक पायाभूत सुविधा उभारण्यासाठी इंटरलँड वॉटरवेज ॲथॉरिटी ऑफ इंडियाकडून (आयडब्ल्यूएआय) खात्याला निधी उपलब्ध झाला आहे. दरम्यान, गोव्यात वॉटर मेट्रो सुरू करण्याच्या दृष्टीने कोची मेट्रो रेल लिमिटेडकडून तपासणी करण्यात आली आहे.

त्याचा अहवाल खात्याला प्राप्त झाला आहे. मात्र, अद्याप वॉटर मेट्रो सुरू करण्याबाबत कोणतेही ठोस पाऊल उचलण्यात आलेले नाही, असेही उत्तरात नमूद करण्यात आले आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Android युजर्ससाठी खूशखबर! WhatsApp चा लूक पूर्णपणे बदलणार; आता तुमच्या फोनमध्येही दिसणार iPhone सारखा स्टायलिश 'फ्लोटिंग बार'!

Goa Postmen: गोव्यातील पोस्टमन 'आऊटसाईडर', 15 वर्षांपासून रोजंदारीवर; कायमस्वरूपी नोकरीसाठी आमदार आमोणकरांना साकडे

Pakistan Minister Video: ''अशी परत जाऊ नकोस''! पाकिस्तानी मंत्र्याचा महिला पत्रकाराची खिल्ली उडवणारा व्हिडिओ व्हायरल; यूजर्सनी घेतलं फैलावर

VIDEO: 'मुंबईचा राजा रोहित शर्मा...' मैदानात चाहत्यांची जोरदार घोषणाबाजी; हिटमॅनची 'ती' खास रिअ‍ॅक्शन कॅमेऱ्यात कैद, व्हिडिओ व्हायरल!

आखाड्यात अनियमित पाणीपुरवठ्याने नागरिक त्रस्त, महिलांची पाण्यासाठी धावपळ; विहिरींचे पाणीही पिण्यायोग्य नसल्यानं नाराजी

SCROLL FOR NEXT