Terekhol River gomantak digital news
गोवा

Terekhol River Goa : नदीपात्रानजीकचा भराव खचतोय; तातडीने पाऊल उचलण्याची स्थानिकांची मागणी

रस्त्याला धोका : पोरस्कडे रेल्वे पुलाजवळ उपाययोजनेची मागणी

गोमंतक ऑनलाईन टीम

मोरजी : पोरस्कडे पेडणे रेल्वे पुलाच्या बाजूला राष्ट्रीय महामार्ग ६६ लगत नदीच्या पात्रात टाकलेला मातीचा भराव हळूहळू खचत असल्याचे चित्र दिसत आहे. यावर सरकारने त्वरित उपाययोजना करावी, अशी मागणी नागरिक करत आहेत. राष्ट्रीय महामार्ग ६६ चे काम एमव्हीआर कंपनी करत आहे. राष्ट्रीय महामार्गाचे काम पोरस्कडे रेल्वे पुलाजवळ धोकादायक बनलेले आहे. या ठिकाणी ३ वर्षांपूर्वी रस्ता पाण्यात गेला होता.

१०० मीटर रस्ता आणि संरक्षक भिंत तेरेखोल नदीने गिळंकृत केली होती. त्यानंतरही सरकारला आणि कंत्राटदाराला जाग आली नाही. या रस्त्यालगत ज्या पद्धतीने सरकारच्या कंत्राटदाराने तेरेखोल नदीच्या पात्रात मातीचा भराव टाकून रस्ता तयार केला. त्या अगोदर त्यांनी संरक्षक भिंत उभारण्याची गरज होती.

कचराही नदीतच

प्रवाहाबरोबर मातीही हळूहळू नदीत जात आहे. शिवाय काहीजण टाकाऊ बांधकाम साहित्य टाकत असल्याचेही दिसत आहे. भविष्यात उर्वरित रस्ता पाण्यात जाऊन मोठी दुर्घटना घडू शकते. यावर सरकारने त्वरित उपाययोजना करावी अशी मागणी केली जात आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

A R Rahman: "हिंदी शिक नाहीतर...."! संगीतकार ए.आर. रहमाननी सांगितला सुभाष घईंचा किस्सा; म्हणाले, बॉलिवूडमध्ये रहायचे असेल तर..

Siolim Bridge Car Stunts: स्टंटबाजीचा नाद अन् पोलिसांचा प्रसाद! शिवोली पुलावरील घटनेनंतर 'रेंटेड कार' जप्त, पर्यटकावर गुन्हा दाखल

Arpora Nightclub Fire: 'बर्च अग्निकांड' प्रकरण; फरार सचिव रघुवीर बागकर अखेर गजाआड! हणजूण पोलिसांची कोलवाळेत कारवाई

Russian Woman Murder: 1 नाही, 2 रशियन महिलांचा खून! नाव-वय सारखे असल्याने वाढला गोंधळ; संशयित आरोपीच्या कबुलीने गोव्यात खळबळ

Goa Latest Updates: ईडीच्या कार्यालयासमोर गाड्यांचा ताफा

SCROLL FOR NEXT