Morji : पेडण्यातील राष्ट्रीय महामार्ग ‘मृत्यूचा सापळा’ ; वाहनांची कसून तपासणी करण्याची मागणी

अपघातांची मालिका थांबेना : विकास प्रकल्प घातक; वाहनांची कसून तपासणी करण्याची मागणी
 Pernem Accident
Pernem AccidentGomantak Digital Team
Published on
Updated on

Morji : पेडणे तालुक्यातील राष्ट्रीय महामार्ग 66 वरील अपघातांची मालिका संपता संपेना. येथील प्रकल्पांसाठी पेडणेतील भूमिपुत्रांनी करोडो चौरस मीटर जमीन दिली आहे. त्यामध्ये राष्ट्रीय महामार्गाचे रुंदीकरण, मोपा आंतरराष्ट्रीय विमानतळ आणि धारगळ ते मोपा विमानतळापर्यंतच्या लिंक रस्त्यासाठी जमिनी गेल्या आहेत. आता हेच प्रकल्प मनुष्यांचे बळी घेत असल्याचे भयानक चित्र दिसून येत आहे.अपघातांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे. वाहतूक पोलिस कुठे काय करतात त्याचा थांगपत्ता लागत नाही.

या प्रकल्पाच्या बांधकामासाठी वापरण्यात येणारी वाहतूक सेवा, या वाहनांचे क्रमांक बनावट आहेत की खरे? ही वाहने जुनी आहेत की पंधरा वर्षांपेक्षाही जास्त वर्षांची आहेत? याची तपासणी वाहतूक खाते करत नाहीत. पेडणे आरटीओ कार्यालयाचे अधिकारी लिंक रस्त्याच्या उड्डाणपुलाचे बांधकाम करत असताना जी वाहतूक सेवा त्या ठिकाणी कार्यरत आहे, त्याची तपासणी का करत नाहीत. मोपा विमानतळावर अर्ध्याअधिक विमानतळाचेही काम सुरू आहे.

 Pernem Accident
Morjim येथील मैदानाची दुरवस्था | GoamantakTV

त्या ठिकाणी बांधकाम क्षेत्राशी निगडित असलेली वाहने त्यांची तपासणी का होत नाही, असा प्रश्न आता निर्माण होत आहे.राष्ट्रीय महामार्ग धारगळ-महाखाजन ते पत्रादेवीपर्यंतच्या रस्त्याचे काम करताना आतापर्यंत एकूण 22 बळी या रस्त्याने घेतलेे आहेत. त्यामध्ये पत्रादेवी, तोरसे, जैतीर, मालपे, पोरस्कडे, न्हयबाग, धारगळ, सुकेकुळण, वजरी जंक्शन या रस्त्यांवरील वाहनचालक असुरक्षित आहेत.

दक्षता घ्यावी!

लिंक रोडचा जो फ्लायओव्हर महामार्गावरून जातो, त्याच्याखालून रोज हजारो वाहने जात असतात. वर काम सुरू असताना खालून जाणाऱ्या वाहनांवर काहीही जड वस्तू पडण्याची भीती असून कंत्राटदाराकडून काळजी घेण्यात आलेली नाही. काम सुरू आहे तिथे तात्पुरती जाळी लावली आहे; पण ती पुरेशी नाही, याची दखल घेऊन उपाययोजना लवकर करावी, अशी मागणी केली जात आहे.

 Pernem Accident
Morjim News : मोरजी किनारी पलंग थाटून अतिक्रमण! बेकायदा शॅक्स व्यवसाय सुरूच

पाचवा अपघात

धारगळ-सुकेकुळण येथील राष्ट्रीय महामार्ग 66 वरील हा आतापर्यंतचा पाचवा अपघात आहे. या भीषण अपघातांमध्ये आतापर्यंत दोन बळी गेले, तर तीन गंभीर जखमी झालेले आहेत.

‘ऑन ड्युटी’ वाहनांचा वापर

सरकारी कामांसाठी वापरल्या जाणाऱ्या अवजड वाहनांवर ‘ऑन ड्युटी’ असा फलक लावलेला असतो. मात्र, ऑन ड्युटी अवजड वाहनांमधून बेकायदेशीरपणे रेती, चिरे, खडी, दगड, इतर साहित्यदेखील नेले जाते. याचे अनेक पुरावे गावात जर फेरफटका मारला तर मिळतील. याकडे वाहतूक खात्याचे पूर्णपणे दुर्लक्ष झालेले आहे.

 Pernem Accident
Morjim : मंदिरे ही संस्कृतीची केंद्रे, त्‍यांचे जतन करा - डॉ. गणेश गावकर

वाहन परवाने नाहीत

मोपा विमानतळ लिंक उड्डाणपूल आणि राष्ट्रीय महामार्ग 66 चे काम करत असताना जी अनेक अवजड वाहने आहेत, त्या वाहनांचे आता परवाने तपासण्याची गरज आहे. अशी अनेक अवजड वाहने आहेत ज्या वाहनांचा इन्शुरन्स, त्यांचे परवाने आणि पीयूसीची मुदत संपलेल्या स्थितीत असून, ही वाहने अवजड माल घेऊन वाहतूक करत असतात.

कंत्राटदारावर अंकुश नाही

आतापर्यंत अपघातांत बळी गेलेल्यांना नुकसान भरपाई किंवा सहानुभूती दाखविलेली नाही. राष्ट्रीय महामार्ग रुंदीकरणाचे काम एमव्हीआर या कंत्राटदाराला मिळालेे आहे. हे काम करताना कंत्राटदार मनमानी पद्धतीने काम करत आहे. या कंत्राटदारावर सरकारचा अजिबात अंकुश नाही. उलट या कंत्राटदाराच्या चुकांवर पांघरूण घातले जात आहे.

 Pernem Accident
Morjim News : एका लॅपटॉपवर ‘आधार’ त्रासदायक! पेडणेतील नागरिकांची गैरसोय

सुरक्षा व्यवस्थेची मोपात वानवा

मोपा विमानतळावर जाण्यासाठी राष्ट्रीय महामार्ग धारगळ येथील सुकेकुळण ते मोपा विमानतळापर्यंतच्या साडेसहा किलोमीटर लांबीच्या उड्डाणपुलाचे बांधकाम युद्धपातळीवर सुरू आहे. हे उड्डाणपूल तयार करत असताना कसल्याच प्रकारची त्या ठिकाणी सुरक्षा व्यवस्था, वाहतूक पोलिस तैनात करण्यात आलेले नाहीत.

 Pernem Accident
Morjim : बेकायदा घरे, दुकानांना २ टक्के टॅक्स लावणार

कंत्राटदारावर अंकुश नाही

आतापर्यंत अपघातांत बळी गेलेल्यांना नुकसान भरपाई किंवा सहानुभूती दाखविलेली नाही. राष्ट्रीय महामार्ग रुंदीकरणाचे काम एमव्हीआर या कंत्राटदाराला मिळालेे आहे. हे काम करताना कंत्राटदार मनमानी पद्धतीने काम करत आहे. या कंत्राटदारावर सरकारचा अजिबात अंकुश नाही. उलट या कंत्राटदाराच्या चुकांवर पांघरूण घातले जात आहे.

फक्त तालांव देतात? :

पेडणे तालुक्यातील वाहतूक पोलिस हे केवळ राष्ट्रीय महामार्ग आणि गावातील मुख्य रस्त्यांच्या बाजूला उभे राहून येणाऱ्या-जाणाऱ्या वाहनांना अडवून चालकांना तालांव देण्याचे काम करत आहेत. कोणत्याही क्षणी कोणत्याही ठिकाणी चुकीच्या मार्गावर उभे राहणारे हे पोलिस रस्त्याच्या अपघातालाही कारणीभूत ठरत आहेत. त्यांच्यावरच आता अधिकाऱ्यांनी कारवाई करण्याची गरज आहे.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com