पणजी: सणासुदीत (Festival) मिठाईचे दर वाढतात, असा अलिखित नियमच होऊन बसला आहे. यंदा आठ दिवसांपूर्वी साखरेचा दर पाच रुपयांनी वाढले आहेत. त्यामुळे मिठाईचे दर वाढविण्यात आल्याचे स्वीट मार्ट दुकानदारांचे (Goa Sweet Mart) म्हणणे आहे. इतर कच्च्या मालाचे दर मात्र स्थिर आहेत.
राज्यात इंधन दरवाढीचा परिणाम म्हणून गृहोपयोगी साहित्यांचे दर आधीच गगनाला भिडले आहेत. त्यात गणेश चतुर्थीच्या कालावधीत साखरेचा दर वधारला आहे. बेसन, रवा आणि दूध या मिठाईत अधिक प्रमाणात वापरल्या जाणाऱ्या पदार्थांचे दर मात्र स्थिर आहेत. तरीही केवळ साखर महागल्याच्या कारणावरून मिठाईचे दर वाढविण्यात आल्याचे ग्राहकांचे म्हणणे आहे. त्याउलट मिठाई व्यावसायिकांचे म्हणणे आहे. मात्र, या गडबडीत जनतेच्या खिशाला झळ पोहोचली आहे.
कच्च्या मालाचे दर
साखर आता 45 रुपये झाली आहे. बेसन प्रती किलो 80, रवा 35 रुपये किलो आहे. खाद्यतेलाचे दर 140 रू. प्रति किलोवरून 130 झाले आहेत. हे दर आणखी वाढण्याची शक्यता व्यापारी एन. एस. मांद्रेकर यांनी व्यक्त केले.
भेसळीवर हवे नियंत्रण
मिठाईसाठीच्या साहित्याचे दर वाढत असल्यामुळे भेसळीचे प्रमाण वाढण्याची दाट शक्यता आहे. त्यावर खात्याने नियंत्रण ठेवण्याची गरज नागरिकांतून व्यक्त करण्यात येत आहे.
मिठाईला फळांचा पर्याय
मिठाईचे दर वधारल्यामुळे बाजारात सध्या हिमाचल किन्नूर, सिमला, नागपूरी सफरचंदाना मागणी वाढली. सिमला किन्नूर हा सफरचंद दुर्मिळ असतो. त्याचा दर सध्या 150 रू.प्रतिकिलो, सिमला 120 रू., माल्प 150 रू., नागपुरी सफरचंद 100 रू., थायलंड पेरू 120 रू., पेरू 80 रू., चिकू 100 रू., बटर फ्रूट 250 तर सिताफळ 120 रूपये किलो.
मिठाईच्या दरात जास्त वाढ झालेली नाही, केवळ काही पदार्थांचे दर पाच टक्क्यांनी वाढले आहेत. पण ते स्थिर राहतील, याबाबत साशंकता आहे. ते आणखी वाढतील. कारण, साखरेसह सुक्या मेव्याचे दर दिवसेंदिवस वाढत आहेत.
- रजत पुराेहित, दुकानमालक
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.