मालवाहू जहाजावरील खलाशासाठी धावून आले भारतीय तटरक्षक जवान

फेअरचेम कटाना मालवाहू जहाजावरील आजारी खलाशाला उपचारासाठी खासगी इस्पितळामध्ये पाठविण्यात आले
मालवाहू जहाजावरील खलाशाला घेवून जातांना भारतीय तटरक्षक जवान
मालवाहू जहाजावरील खलाशाला घेवून जातांना भारतीय तटरक्षक जवानDainik Gomantak
Published on
Updated on

दाबोळी: किनाऱ्यापासून 250 सागरी मैलावर असलेल्या फेअरचेम कटाना मालवाहू जहाजावरील आजारी खलाशाला (Sailor) मंगळवारी रात्री भारतीय तटरक्षक दलाच्या गोवा विभागाने (Goa Division of Indian Coast Guard) तातडीने वैद्यकीय मदत पुरविली. अमित कुमार सिंग असे त्या खालाशाचे नाव आहे. बुधवारी पहाटे मुरगाव बंदरात (Murgaon Port) आल्यावर त्याची वैद्यकीय तपासणी करून पुढील उपचारासाठी खासगी इस्पितळामध्ये पाठविण्यात आले.

मुंबईच्या सागरी बचाव समन्वय केंद्राकडन अमित याला तातडीने वैद्यकीय मदतीची गरज असल्याचा संदेश भारतीय तटरक्षक दलाला मिळाला होता. तो मधुमेह केटोएसिडोसिसने ग्रस्त असल्याची माहिती मिळाली. यानंतर रिमोटऑपरेटिंग स्टेशन ऑपरेटद्वारे रडारवर जहाजाचे ठिकाण शोधण्यात आले. कॅप्टनाला योग्य सूचना करून जहाज मुरगाव बंदराकडे आणण्याची सूचना करण्यात आली.

मालवाहू जहाजावरील खलाशाला घेवून जातांना भारतीय तटरक्षक जवान
Goa Mining Draftला राज्यपालांची मान्यता

मच्छीमारांना वाचवले

बागा - कळंगुट येथील समुद्रात मासेमारीसाठी निघालेल्या मच्छीमारांची होडी समुद्रातील लाटांच्या तडाख्यात उलटली. त्‍यावेळी प्रसंगावधान राखत पाण्यात उड्या घेतलेल्या सहाजणांचे दृष्टीच्‍या कर्मचाऱ्यांच्‍या तत्‍परतेमुळे जीव वाचले. प्राण वाचविण्यासाठी मच्छीमारांनी समुद्रात उड्या घेतल्‍या. त्‍यानंतर दृष्टीचे जीवरक्षक पर्यवेक्षक मंगेश गावस यांनी जेट स्कायचा आधार घेत बचाव केला. त्‍यांचे सहकारी मित्र बाबाजी नाईक, प्रथमेश महाले त किरण पवार यांच्या मदतीने सहाही खलाशांना सुरक्षित किनाऱ्यावर आणले. किनाऱ्यावर कर्मचाऱ्यांची आरोग्य तपासणी केली असता ते सुरक्षित असल्याचे सांगण्‍यात आले.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com