Manoj Parab news Dainik Gomantak
गोवा

Goa Politics: "मी माझे शब्द मागे घेतो..." माणिकराव ठाकरेंवरील टीकेनंतर मनोज परब यांचा जाहीर 'माफीनामा'

Manoj Parab Apology : रिव्होल्युशनरी गोअन्स पार्टीचे अध्यक्ष मनोज परब यांनी काँग्रेसचे गोवा प्रभारी माणिकराव ठाकरे यांच्यावर केलेल्या टीकेबद्दल जाहीर माफी मागितली

Akshata Chhatre

Manoj Parab apology news: रिव्होल्युशनरी गोअन्स पार्टीचे (RGP) अध्यक्ष मनोज परब यांनी काँग्रेसचे गोवा प्रभारी माणिकराव ठाकरे यांच्यावर केलेल्या टीकेबद्दल जाहीर माफी मागितली आहे. जिल्हा पंचायत निवडणुकीच्या निकालांच्या पार्श्वभूमीवर घडलेली ही घटना अनेकांच्या भुवया उंचावत आहे. युती फिसकटल्यामुळे निर्माण झालेल्या निराशेपोटी आपण ते कठोर विधान केले होते, असे सांगत परब यांनी आता दिलगिरी व्यक्त केली आहे.

जिल्हा पंचायत निवडणुकीत 'आरजीपी'ची कामगिरी

नुकत्याच लागलेल्या जिल्हा पंचायत निवडणुकीच्या निकालात 'आरजीपी'ने आपले अस्तित्व सिद्ध केले. पक्षाने ग्रामीण गोव्यात फक्त एकाच जागी जिंकण्यात यश मिळवले आणि यानंतर मनोज परब यांच्यावर अनेक प्रश्नचिन्ह निर्माण व्हायला सुरुवात झालीये.

अनेक मतदारसंघांमध्ये 'आरजीपी'च्या उमेदवारांनी भाजप आणि काँग्रेसच्या उमेदवारांना कडवी झुंज दिली. मात्र, काही काँग्रेस आणि आरजीपीची युती न झाल्यामुळे मतांचे विभाजन झाले, ज्याचा थेट फायदा सत्ताधारी भाजपला मिळाला आणि त्यांनी ५० पैकी २८ जागा जिंकून बहुमत मिळवले.

माफीनामा आणि युतीची रुखरुख

मनोज परब यांनी आपल्या निवेदनात म्हटले की, "गोव्याच्या मोठ्या हितासाठी काँग्रेससोबत युती व्हावी, अशी आरजीपीची प्रामाणिक इच्छा होती. मात्र, युती तुटल्यामुळे मी भावनिकदृष्ट्या अस्वस्थ झालो होतो. माणिकराव ठाकरे यांच्याबद्दल वापरलेले शब्द हे वैयक्तिक द्वेषातून नव्हते, तर केवळ त्यावेळच्या निराशेपोटी आलेली ती एक प्रतिक्रिया होती. मी माझे शब्द मागे घेतो आणि माणिकराव ठाकरे यांची मनापासून माफी मागतो."

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Sporting Club Goa: दीपांकुर शर्मा यांच्या खांद्यावर मोठी जबाबदारी; आय-लीग 2 मध्ये दमदार कामगिरीचे लक्ष्य

Goa Research: त्वचेच्या उपचारात 3D तंत्रज्ञानाची नवी झेप! स्वस्त आणि सुरक्षित जलजेल विकसित

Colvale Central Jail: कोलवाळ कारागृहात वाईननिर्मितीचा आरोप; प्रशासनाचा स्पष्ट इन्कार, 'सुरक्षा कडक केल्याने नाराजांचे षड्‌यंत्र'

Illegal Hill Cutting Case: 4 वर्षांच्या लढ्याला अखेर यश! हडफडेची बेकायदा कापलेली टेकडी पूर्ववत; हायकोर्टानं प्रकरण काढलं निकाली

Toxic Movie Release: 'टॉक्सिक'चा धमाका! रॉकस्टार यशची रुपेरी पडद्यावर धमाकेदार एन्ट्री; थिएटर्सबाहेर चाहत्यांची तोबा गर्दी VIDEO

SCROLL FOR NEXT