Revolutionary Goans | Manoj Parab Dainik Gomantak
गोवा

Revolutionary Goans : नगर नियोजन कायद्यात दुरुस्ती गोमंतकियांना मारक ठरणार

नगर नियोजन कायद्यात दुरुस्ती केलेल्याचा निषेध करण्यासाठी येत्या 23 सप्टेंबरला रिव्होल्यूशनरी गोवन्स पक्षातर्फे पणजीतील शहर व नगर नियोजन खात्यासमोर निदर्शने करण्यात येणार आहेत.

विलास महाडिक

Revolutionary Goans : नगर नियोजन कायद्यात दुरुस्ती केलेल्याचा निषेध करण्यासाठी येत्या 23 सप्टेंबरला रिव्होल्यूशनरी गोवन्स पक्षातर्फे पणजीतील शहर व नगर नियोजन खात्यासमोर निदर्शने करण्यात येणार आहेत. तसेच सरकारकडे ही दुरुस्ती रद्द करण्याची मागणी केली जाईल अशी माहिती पक्षाचे प्रमुख मनोज परब यांनी आज पत्रकार परिषदेत बोलताना दिली.

सरकारने कायद्यातील ही दुरुस्ती आधीच राजपत्रात फक्त इंग्रजीतून प्रसिद्ध केली असून ती कोकणी आणि मराठीतूनही प्रसिद्ध करावी. जेणेकरून राज्यातील गोमंतकियांना सरकारने केलेल्या दुरुस्तीबाबत सविस्तर माहिती कळू शकेल.

नगर नियोजन मंत्री विश्वजित राणे यांनी नगर व शहर नियोजन कायद्यात आणलेली दुरुस्ती ही परप्रांतीय उद्योजकांच्या फायद्यासाठी असल्याने ती गोमंतकियांना मारक ठरणार असल्याचा दावा परब यांनी केला. गोमंतकियांनी एकत्रित होऊन या दुरुस्तीविरुद्ध आवाज उठवून ती रद्द करण्यासाठी 23 सप्टेंबर रोजी एकत्र यावे, असे आवाहन त्यांनी केले आहे.

दरम्यान रिव्हॉल्युशनरी गोवन्सचे आमदार विरेश बोरकर यांनी फुटीर आमदारांचा निषेध करत फुटीरतेबाबत तीव्र शब्दात नाराजी व्यक्त केली. यावेळी बोरकर म्हणाले की, फुटीर आमदारांना स्वत:वर विश्वास आहे तर त्यांनी राजीनामा देत पुन्हा निवडणूक लढवावी, जनता तुम्हाला कधीच माफ करणार नाही. पणजी येथील आझाद मैदानावर रविवारी निदर्शने करण्यात आली यावेळी त्यांनी काँग्रेसच्या बंडखोर आमदारांवर थेट निशाणा साधला.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Yemen Saudi Arabia Missile Attack: यमनचा सौदीवर मोठा हल्ला! हवाई अड्डे उद्ध्वस्त, रिफायनरीतून आगीचे लोट; कोट्यवधींचे नुकसान

Talha Saeed Anti India Speech: ''दिल्ली कुणाची होती विसरलात का?" हाफिज सईदच्या लेकानं भारताविरोधात ओकली गरळ; तल्हा सईदच्या रॅलीनं वादंग VIDEO

Goa Ashtami Fair: 'अष्टमी'च्या फेरीने मांडवी किनारा गजबजला! कार्यालये सुटताच गर्दीला उधाण; कपड्यांच्या खरेदीला सर्वाधिक पसंती

India Defence Deal: चीन-पाकिस्तानचा थरकाप उडणार! भारतीय सैन्याची ताकद अनेक पटींनी वाढणार; 1.10 लाख कोटींच्या संरक्षण कराराला मोदी सरकारची मंजुरी

Collared Kingfisher Research: गोव्याच्या किनारी परिसंस्थेसाठी 'कॉलर्ड किंगफिशर'चा अभ्यास! MFG- GBCNचा संयुक्त संशोधन प्रकल्प; पक्ष्याबाबत मिळविणार माहिती

SCROLL FOR NEXT