Viresh Borkar and Manoj Parab issue Dainik Gomantak
गोवा

Goa Politics: आमदार वीरेश बोरकर मांडणार भूमिका? पक्षातील अंतर्गत वाद आणि मनोज परब यांच्‍याबाबत काय बोलणार?

Viresh Borkar RG Stand: पक्षाचे आमदार वीरेश बोरकर सोमवारी जनतेसमोर आपली भूमिका मांडणार असल्‍याची माहिती पक्षाच्‍या सूत्रांनी आज ‘गोमन्‍तक’शी बोलताना दिली.

दैनिक गोमन्तक डिजिटल

पणजी: मनोज परब यांनी ‘आरजी’ पक्षाचा राजीनामा दिल्‍यानंतरही शांत राहिलेले या पक्षाचे आमदार वीरेश बोरकर सोमवारी जनतेसमोर आपली भूमिका मांडणार असल्‍याची माहिती पक्षाच्‍या सूत्रांनी आज ‘गोमन्‍तक’शी बोलताना दिली.त्‍यामुळे पक्षातील अंतर्गत वाद आणि मनोज परब यांच्‍याबाबत ते काय बोलणार, याकडे सर्वांचे लक्ष लागून राहिले आहे. आमदार बोरकर यांच्‍या जवळचे असलेले आगशीचे पंच ज्‍युलियस आल्‍मेदा यांच्‍यावर पक्षाने केलेल्‍या कारवाईनंतर पक्षातील अंतर्गत वाद उफाळून आला.

या निर्णयाला पक्षाच्‍या सांत-आंद्रे गटाने तीव्र आक्षेप घेतल्‍यानंतर पक्षात मनोज परब आणि वीरेश बोरकर असे दोन गट तयार झाले. या दोन गटांतील धुसफूस अनेक दिवस कायम राहिल्‍यानंतर परब यांनी आक्रमक होत बोरकर यांच्‍यासह त्‍यांच्‍या जवळच्‍या सदस्‍यांवर फेसबुकद्वारे टीकास्र सोडले. शिवाय बोरकर यांना ‘कारणे दाखवा’ नोटीस जारी करत, गेल्‍या सोमवारी आयोजित केंद्रीय कार्यकारिणीच्‍या (सीईसी) बैठकीला उपस्‍थित राहून स्‍पष्‍टीकरण देण्‍याच्‍या सूचना दिल्‍या. परंतु गोव्‍याबाहेर असल्‍याचे सांगत बोरकर यांनी या बैठकीकडे पाठ फिरवली.

त्‍याचवेळी फेसबुकद्वारेच आपल्‍या मनातील खदखदही व्‍यक्त केली.हा वाद टोकाला गेला असतानाच बोरकर यांनी गेल्‍या बुधवारी ‘गोमन्‍तक’शी बोलताना, आरजीपीत ‘सीईसी’ अंतिम नाही. त्‍यामुळे अंतर्गत वादामुळे निराश झालेले पदाधिकारी, कार्यकर्त्यांशी चर्चा करूनच आपण ‘सीईसी’समोर जाईन, असे म्‍हणत मनोज परब यांना आव्‍हान दिले होते. त्‍यानंतर दुसऱ्याच दिवशी गुरुवारी परब यांनी पक्षाच्‍या अध्‍यक्ष आणि संस्‍थापक सदस्‍यत्‍वाचाही राजीनामा दिला. शिवाय राजकीय संन्‍यास घेत असल्‍याचीही घोषणा केली होती.

या घडामोडींच्‍या काळातच १९ मे रोजी झालेल्‍या ‘सीईसी’च्‍या बैठकीत पक्षाने सर्वच गटसमित्‍या बरखास्‍त केल्‍या होत्‍या हे स्‍पष्‍ट झाले. सरचिटणीस विश्‍‍वेश नाईक यांनी या निर्णयाची माहिती तब्‍बल पाच दिवसांनंतर पदाधिकारी, कार्यकर्त्यांना दिल्‍याने राजीनामा दिलेले मनोज परब पूर्णपणे उघडे पडले. ‘सीईसी’च्‍या या भूमिकेवरून मात्र पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांत संभ्रम पसरला आहे.

पक्ष ताब्‍यात घेणार?

आमदार वीरेश बोरकर यांनी गेल्‍या काही दिवसांत पक्षाचे ज्‍येष्‍ठ पदाधिकारी तसेच नाराज कार्यकर्त्यांच्‍या गुप्‍त गाठीभेटी घेतल्‍या. त्‍यामुळे इतके दिवस नाराज असलेले बोरकर पक्ष स्‍वत:च्‍या ताब्‍यात घेणार का? याबाबत उत्‍सुकता लागून राहिली आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa Formula Racing Scam: वीजबिलांचा भार जनतेवर; मोपा येथे महाघोटाळा, सवलतींचा वर्षाव इव्हेंटवर, काँग्रेससह इतर विरोधी पक्षांनीही केला आरोप

Goa Politics: 'आरजी'चा फुटबॉल वीरेशच्या हाती; राष्ट्रीय अध्यक्ष या नात्याने तडकाफडकी राज्य समित्या बरखास्त

Sanjil Kudchadkar Kidnapping Case: कोंब-मडगाव परिसरातील घटनेमुळे खळबळ; कौटुंबिक वादातून पॅथॉलॉजी लॅबचालकाचे अपहरण

Maharashtra FDA Action: तुकाराम मुंढेंचा बॉलिवूडला दणका! गुटख्याची जाहिरात करणाऱ्या सेलिब्रिटींवर होणार कारवाई; एफडीए ॲक्शन मोडवर

Himachal Pradesh Landslide: हिमाचलमध्ये भीषण अपघात! चालत्या सुमोवर कोसळली दरड; 13 प्रवाशांचा दुर्दैवी मृत्यू

SCROLL FOR NEXT