Manoj Parab on Mahadayi Water Dispute Dainik Gomantak
गोवा

Revolutionary Goans : ‘आरजी’ लढवणार लोकसभा निवडणूक!

अंतिम निर्णय जूनमध्ये घेणार : मनोज परब

दैनिक गोमन्तक डिजिटल

Revolutionary Goans : आगामी लोकसभा निवडणुकीत गोव्यात भाजपला लगाम घालण्यासाठी मजबूत उमेदवार उभे करणे शक्य आहे का, यावर विरोधी पक्षांची चाचपणी सुरू असली तरी रिव्‍होल्‍युशनरी गोवन्‍स (आरजी) पक्षाने लोकसभा निवडणूक आपण लढविणार असल्‍याचे संकेत दिले आहेत.

पक्षाच्या कार्यकर्त्यांची काल केपे येथे बैठक झाली. त्यावेळी पक्षाचे सर्वेसर्वा मनोज परब यांनी वरील संकेत दिले.

‘गोमन्‍तक’शी बोलताना ते म्हणाले, सध्या आम्ही ग्रामपंचायत आणि पालिका स्तरावर पक्ष मजबूत करण्‍याच्‍या प्रक्रियेत आहोत. त्याद्वारे आम्ही आमची शक्ती पडताळून पाहणार आहोत. ही प्रक्रिया पूर्ण झाल्यावर जून महिन्याच्या सुमारास लोकसभा निवडणुकीत उतरावे का, याबाबत निर्णय घेऊ असे त्यांनी सांगितले.

वास्तविक आरजी हा प्रादेशिक पक्ष. त्यामुळे लोकसभा निवडणूक लढवण्यास त्यांना स्वारस्य आहे का? असा प्रश्न परब यांना विचारला असता ते म्हणाले, गोवा विधानसभेत आमचा एक आमदार निवडून आल्याने आत्‍मविश्‍‍वास वाढला आहे.

आता राष्ट्रीय पातळीवर गोव्याचा आवाज पोचवणे गरजेचे आहे असे आम्हाला वाटते. दरम्‍यान, या बैठकीला केपे, कुडचडे आणि सांगे मतदारसंघातील आरजीचे कार्यकर्ते उपस्थित होते.

"आजपर्यंत लोकसभेवर निवडून आलेल्‍या खासदारांनी गोव्याचे प्रश्न कधीच प्रभावीपणे मांडलेले नाहीत. ते मांडण्यासाठीच आम्हाला लोकसभेत प्रवेश मिळवायचा आहे. गोव्यात केंद्र सरकारच्या नोकऱ्यांमध्ये गोवेकरांना प्राधान्य, म्हादई प्रश्र्न, गोव्याला खास दर्जा असे किती तरी प्रश्र्न केंद्रात प्रभावीपणे मांडण्याची गरज त्यांनी आहे."

- मनोज परब, आरजीचे सर्वेसर्वा

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Yemen Saudi Arabia Missile Attack: यमनचा सौदीवर मोठा हल्ला! हवाई अड्डे उद्ध्वस्त, रिफायनरीतून आगीचे लोट; कोट्यवधींचे नुकसान

Talha Saeed Anti India Speech: ''दिल्ली कुणाची होती विसरलात का?" हाफिज सईदच्या लेकानं भारताविरोधात ओकली गरळ; तल्हा सईदच्या रॅलीनं वादंग VIDEO

Goa Ashtami Fair: 'अष्टमी'च्या फेरीने मांडवी किनारा गजबजला! कार्यालये सुटताच गर्दीला उधाण; कपड्यांच्या खरेदीला सर्वाधिक पसंती

India Defence Deal: चीन-पाकिस्तानचा थरकाप उडणार! भारतीय सैन्याची ताकद अनेक पटींनी वाढणार; 1.10 लाख कोटींच्या संरक्षण कराराला मोदी सरकारची मंजुरी

Collared Kingfisher Research: गोव्याच्या किनारी परिसंस्थेसाठी 'कॉलर्ड किंगफिशर'चा अभ्यास! MFG- GBCNचा संयुक्त संशोधन प्रकल्प; पक्ष्याबाबत मिळविणार माहिती

SCROLL FOR NEXT