Francisco Sardinha on BJP: आमदारांना भाजप विकत घेणार? काय म्हणाले सार्दिन वाचा सविस्तर

सार्दिन : दक्षिणेत विजय मिळणार या भ्रमात शहांनी राहू नये
Francisco Sardinha
Francisco SardinhaDainik Gomantak
Published on
Updated on

Francisco Sardinha on BJP: दक्षिण गोव्यातील काँग्रेसच्या आमदारांना विकत घेतल्यामुळे आगामी लोकसभा निवडणुकीत हा मतदारसंघ भाजप जिंकेल या भ्रमात केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी मुळीच राहू नये. गोमंतकीय संस्कृती गुजरातपेक्षा पुष्कळ वेगळी आहे.

भाजप आमदारांना विकत घेईल, पण दक्षिण गोव्यातील मतदारांना कदापी विकत घेऊ शकणार नाही. दक्षिणेतील मतदार भाजपच्या भूलथापांना बळी पडणारे नाहीत, असे दक्षिण गोवा काँग्रेसचे खासदार फ्रान्‍सिस सार्दिन यांनी आज मडगावात घेतलेल्या पत्रकार परिषदेत सांगितले.

Francisco Sardinha
Goa Congress on Water Issue: पाणी प्रश्‍न न सोडवल्यास आंदोलनाचा इशारा; काँग्रेसचा PWD अधिकाऱ्यांना घेराव

नुकतेच गोव्याच्या भेटीवर आलेले अमित शहा यांनी जाहीर सभेत बोलताना गोव्यातील दोन्ही लोकसभा मतदारसंघ भाजप जिंकेल असे भाकित केले होते.

त्याला अनुसरुन सार्दिन यानी वरील वक्तव्य केले. ते म्‍हणाले, लोक भारतीय जनता पक्षाच्या विरोधात आहेत व ते आगामी निवडणुकीत या पक्षाला योग्य तो धडा शिकवतील.

ज्या लोकांनी स्वत:च्या स्वार्थासाठी पक्ष सोडला व भाजपमध्‍ये सामील झाले, त्याना जनता कधीही स्वीकारणार नाही आणि दारातही उभी करणार नाही.

Francisco Sardinha
G20 Summit Goa 2023: हवामान बदलाबरोबर प्राण्यांचे आरोग्यही महत्त्वाचे!

भाजपतर्फे ज्या सामाजिक योजना सुरू आहेत, त्या सर्व काँग्रेस पक्षाच्या आहेत. भाजपने केवळ या योजनांचे शीर्षक बदललेले आहे, असेही सार्दिन म्‍हणाले. भाजपमुळेच देशात महागाईचा भडका उडालेला आहे.

लोकांना दैनंदिन लागणाऱ्या वस्तूंनी महागाईचा उच्चांक गाठला आहे. सामान्य माणसाला जगणे नकोसे झाले आहे, असे त्‍यांनी सांगितले.

"केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी आपल्‍या गोवा भेटीत म्हादईबाबत एक चकार शब्दही उच्चारला नाही. केवळ मतांसाठी म्हादईचे पाणी कर्नाटकात आम्‍ही कदापि वळवू देणार नाही. गोवा, कर्नाटक व केंद्रातही भाजपचे सरकार आहे. तेव्हा त्यांनी हा प्रश्‍‍न तात्काळ सोडवून गोव्याला न्याय मिळवून द्यावा."

- फ्रान्‍सिस सार्दिन, दक्षिण गोवा खासदार

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com