Goa Congress on Water Issue: राज्यात ठिकठिकाणी पाणी टंचाई जाणवत आहे. अजूनही मे महिना बाकी आहे. अनेकांना टँकरचे पाणी विकत घ्यावे लागत आहे.
प्रत्येक घरात वाहिन्या जोडल्या; पण पाणी कुठे पोहोचले? असा सवाल करत काँग्रेसने सरकार पाणीपुरवठा करण्यात अपयशी ठरल्याचा आरोप केला. पाणी प्रश्न दिलेल्या मुदतीत न सुटल्यास तीव्र आंदोलन छेडण्याचा इशारा काँग्रेसने दिला आहे.
सार्वजनिक बांधकाम खात्याच्या आल्तिनो येथील मुख्य कार्यालयात काँग्रेस प्रदेशाध्यक्ष अमित पाटकर यांच्या अध्यक्षतेखालील शिष्टमंडळाने गुरुवारी मुख्य अभियंता संतोष म्हापणे यांना घेराव घातला. याप्रसंगी काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी त्यांच्यावर प्रश्नांचा भडिमार केला.
काँग्रेसच्या आक्रमक पवित्र्यामुळे म्हापणे यांनी शांतपणे आणि संयमाने टंचाईची कारणे सांगितली. त्यांनी ही समस्या सोडविण्याचे आश्वासन दिले. शिष्टमंडळाने आपल्या मागणीचे निवेदन म्हापणे यांना सादर केले.
याप्रसंगी काँग्रेसचे प्रसिद्धी माध्यम विभाग अध्यक्ष अमरनाथ पणजीकर, तुलिओ डिसोझा, विरिएतो फर्नांडिस, बीना नाईक, वीरेंद्र शिरोडकर, सावियो डिसिल्वा, एव्हरसन वालेस, राजेंद्र कोरगावकर, ॲड. श्रीनिवास खलप, रामकृष्ण जल्मी, विवेक डिसिल्वा, ॲड. जितेंद्र गावकर, प्रणव परब, पॅलेसिया रापोझ आदी उपस्थित होते.
तिळारीचे पाणी मोपाला
यावेळी पाटकर म्हणाले की, राज्यात 80 एमएलडी पाण्याचा तुटवडा आहे, त्याविषयीची नोट राज्य सरकारला सादर करावी. त्याशिवाय राज्यात जी कामे सुरू आहेत, ती बंद करावीत, जेणेकरून त्या कामांना जाणारे पाणी टंचाईच्या ठिकाणी पाठविता येईल.
तिळारी धरण हे सिंचनासाठी बांधले होते, परंतु आज या धरणातून येणारे पाणी मोपा विमानतळाला पुरवले जाते. पाणी पुरवठ्याचे नियोजन नाही, पाणी मीटरचीही तपासणी होत नाही.
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.