Revolutionary Goans Party meeting clash Dainik Gomantak
गोवा

VIDEO: 'आरजी'च्‍या बैठकीत खडाजंगी, आमदार बोरकर आणि अजय खोलकर यांच्यात शाब्‍दिक द्वंद्व; तब्बल पाच तास 'तू-तू, मै-मै'

Revolutionary Goans Party meeting clash: आमदार वीरेश बोरकर शनिवारी सायंकाळी पणजीतील पक्ष कार्यालयातील बैठकीला उपस्‍थित राहिले. परंतु, या बैठकीत ‘सीईसी’चे सदस्‍य आणि आमदार बोरकर यांच्‍यात खडाजंगी झाली.

गोमंतक ऑनलाईन टीम

पणजी: रिव्‍हॉल्‍युशनरी गोवन्‍स पक्षाच्‍या (आरजी) केंद्रीय कार्यकारिणीच्‍या (सीईसी) सूचनेनुसार आमदार वीरेश बोरकर शनिवारी सायंकाळी पणजीतील पक्ष कार्यालयातील बैठकीला उपस्‍थित राहिले. परंतु, या बैठकीत ‘सीईसी’चे सदस्‍य आणि आमदार बोरकर यांच्‍यात खडाजंगी झाली.

आमदार बोरकर यांनी बैठकीत जे विषय उपस्‍थित केले, जे मुद्दे मांडले, त्‍यांची उत्तरे त्‍यांना पुढील बैठकीत देण्‍यात येणार असल्‍याचे खजिनदार अजय खोलकर यांनी पत्रकारांशी संवाद साधताना सांगितले. या बैठकीनंतर पत्रकारांना आमदार वीरेश बोरकर म्‍हणाले, ‘‘पक्षाच्‍या सूचनेनुसार मी ‘सीईसी’च्‍या बैठकीला उपस्‍थित राहून सांत आंद्रे गटासह राज्‍यभरातील कार्यकर्त्यांचे प्रश्‍‍न मांडले आहेत.

गोव्‍याला भ्रष्‍टाचारापासून वाचवण्‍यासाठीच आम्‍ही या पक्षाची स्‍थापना केली होती. त्‍यामुळे शेकडो गोमंतकीय ‘आरजी’वर प्रेम करतात. त्‍यांना हा पक्ष हवा आहे. प्रत्‍येक पक्षामध्‍ये अंतर्गत वाद झडतच राहतात. परंतु, त्‍यावर बंद दाराआड चर्चा होऊन तोडगा निघणे गरजेचे आहे. आमच्‍या पक्षातील वाद सोशल मीडियावर पोहोचला. त्‍यातून वाद आणखी वाढत गेला. हे योग्‍य नव्‍हते. ते वाद चर्चा करून सामोपचाराने मिटवता आले असते.’’

‘‘आरजी पदाधिकारी तसेच कार्यकर्त्यांचे जे प्रश्‍‍न आपल्‍याकडे आले होते, त्‍याची उत्तरे मी सीईसीकडे मागितली आहेत. त्‍यांच्‍याकडून ती मला मिळतीलही; पण आरजीचा आवाज बंद होऊ नये, हाच माझा हेतू आहे,’’ असेही बोरकर म्‍हणाले.

'आरजी’च्‍या मागील ‘सीईसी’ बैठकीत पक्षच बंद करण्‍याबाबत चर्चा झालेली होती. त्‍याची माहिती त्‍या बैठकीला उपस्‍थित असलेल्‍या दोन सदस्‍यांनी आम्‍हाला दिली. कुणालाच विश्‍‍वासात न घेता ‘सीईसी’ने याबाबत चर्चा केल्‍यामुळेच आम्‍ही मडगावात बैठक बोलावण्‍याचा निर्णय घेतला. त्‍या बैठकीला आमदार वीरेश बोरकर उपस्‍थित होते. त्‍यात केवळ कोणत्‍याही परिस्‍थितीत पक्ष बंद करू नये, यावरच आमची चर्चा झाली होती. यात कोणतीही पक्षविरोधी कारवाई नव्‍हती’’, असे पक्षाच्‍या दक्षिण गोवा विभागाच्‍या पदाधिकाऱ्यांनी पत्रकारांशी बोलताना सांगितले.

‘आगशीचे पंच ज्‍युलियस आल्‍मेदा यांनी धार्मिकतेसंदर्भात सोशल मीडियावर ज्‍या पोस्‍ट केल्‍या होत्‍या, त्‍या २०१९ मधील होत्‍या. त्‍यावेळी आरजी संघटना होती, पक्ष नव्‍हता. आरजी पक्षाची स्‍थापना २०२१ मध्‍ये झाली. तरीही आता २०१९ चा संदर्भ देत त्‍यांच्‍यावर कारवाई करण्‍यात आली. आल्‍मेदा यांच्‍याप्रमाणे अनेकांनी पक्षाला विविध माध्‍यमातून सहकार्य केले आहे. त्‍यामुळे त्‍यांच्‍यावरील कारवाईने आम्‍हाला दु:ख झाले’’ असे त्‍यांनी सांगितले.

‘सीईसीने गटांच्‍या बैठका घेण्‍याकडे कायम दुर्लक्ष केले. दक्षिण गोवा विभागाची बैठक दोन वर्षे झालीच नाही. मडगावातील नरकासुर कार्यक्रमात आमदार विजय सरदेसाई यांच्‍यासोबत मनोज परब व्‍यासपीठावर गेले होते. त्‍याची कोणतीही कल्‍पना आम्‍हाला दिली नव्‍हती. सरदेसाई अनेक वर्षांपासून आमदार आहेत. परंतु, अवघ्‍या चार वर्षांपूर्वी आमदार झालेल्‍या वीरेश बोरकर यांनी विधानसभा अधिवेशनांमध्‍ये अनेक प्रश्‍‍नांवरून सत्ताधाऱ्यांना ‘सळो की पळो’ करून सोडले. तरीही त्‍यांची तुलना परब यांनी सरदेसाईंशी केल्‍याने आम्‍हाला दु:ख झाले’,’ असेही त्‍यांनी नमूद केले.

तब्बल पाच तास बैठकीत ‘तू-तू, मै-मै’

गोमन्तकला मिळालेल्या व्हिडिओमध्ये आमदार वीरेश बोरकर आपले म्‍हणणे मांडताना, आपण आमदार या नात्‍याने चिंबलमधील तसेच इतर प्रश्‍‍नांवर कसा आवाज उठवला, हे सदस्‍यांना उभे राहून सांगण्‍याचा प्रयत्‍न करीत आहेत.

त्‍याचवेळी खजिनदार अजय खोलकर आक्रमक होऊन त्‍यांना ‘तू जा, तू जा’ असे सांगत आहेत. त्‍यानंतरही आमदार वीरेश बोरकर आपले मुद्दे सविस्तरपणे मांडण्‍याचा प्रयत्‍न करीत आहेत; परंतु, अजय खोलकर त्‍यांना रोखत स्‍वत:च बोलताना दिसत आहेत.

चांगले काम करणारा अध्‍यक्ष होईल! : ‘आरजी’च्‍या अध्‍यक्षपदाची जागा सध्‍या रिक्त आहे. तुम्‍ही अध्‍यक्ष होऊ पाहता का? असा प्रश्‍‍न पत्रकारांनी केला असता, ‘‘पक्षाच्‍या अध्‍यक्षपदाचा निर्णय निवडणूक समिती घेईल. मी कधीही अध्‍यक्ष पदावर दावा केलेला नाही. जो चांगले काम करतो, तो पक्षाचा अध्‍यक्ष होईल. पण, विधानसभा निवडणुकीपर्यंत पक्षाचे काम संघटितरित्‍या तळागाळापर्यंत पोहोचवणे गरजेचे आहे. चांगल्‍या कामांचे फळ निश्‍चितच मिळत असते. हेच डोळ्यांसमोर ठेवून आपण पक्षाचे काम करत राहू’’, असेही आमदार वीरेश बोरकर यांनी नमूद केले.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Horoscope: रविवार 'या' राशींच्या लोकांसाठी ठरणार वरदान! प्रदीर्घ प्रतीक्षेनंतर मिळणार गुड न्यूज, अपार धनलाभाची शक्यता

Goa Cash For Job Scam: मुलाला पीएसआयची नोकरी देण्याचं आमिष दाखवून निवृत्त पोलिसाला 10 लाखांचा गंडा VIDEO

8th Pay Commission: केंद्रीय कर्मचाऱ्यांची लागणार लॉटरी? मूळ वेतनात 400 टक्क्यांपर्यंत वाढीचा फॉर्म्युला; रेल्वे संघटनेच्या प्रस्तावाने उडवली खळबळ

Vladimir Putin: व्लादिमीर पुतिन 150 वर्षे जिवंत राहणार? रशियन शास्त्रज्ञांच्या दाव्यानं जगभरात खळबळ; प्रयोगशाळेत तयार केले जातायेत मानवी अवयव

घर सुटलं, देश सुटला अन् आता आयुष्यही संपलं! पाकिस्तानातून मायदेशी परतणाऱ्या अफगाण निर्वासितांचा ट्रक उलटला; 18 मृत्यू, 35 जखमी

SCROLL FOR NEXT