पणजी: लोकसभा निवडणुकीत पराभव झाल्यानंतर विश्रांतीवर गेलेल्या रिव्होल्युशनरी गोवन्स पक्षाचे अध्यक्ष मनोज परब यांनी नव्या वर्षात 'रिव्होल्यूशन'चे संकेत दिले आहेत. क्रांती म्हणत परब नव्या वर्षात पक्ष संघटना अधिक मजबूत करण्यासाठी काम करणार का? तसेच, आगामी हिवाळी अधिवेशनात सरकारला घेरण्यासाठी रणनिती आखणार का? याकडे त्यांच्या फेसबुक पोस्टमुळे लक्ष लागले आहे.
मनोज परब यांनी गेल्यावर्षी पार पडलेल्या लोकसभा निवडणुकीत उत्तर गोव्यातून उमेदवारी अर्ज भरला होता. परब यांच्या समोर भाजपचे विद्यामान खासदार श्रीपाद नाईक आणि काँग्रेसचे माजी मंत्री रमाकांत खलप यांचे आव्हान होते. परबांनी निवडणुकीत जाहीर सभांऐवजी घरोघरी जाऊन प्रचार करण्यावर भर दिला होता.
तसेच, विविध मतदारसंघात ते कॉर्नर सभा घेत होते. परब आणि त्यांच्या पक्षाने लोकांपर्यंत पोहचण्याचा प्रयत्न केला पण त्यांना निवडणुकीत यश आले नाही. उत्तर श्रीपाद नाईकांनी आपला गड कायम राखत सहाव्यांदा विजश्री खेचून आणला.
लोकसभेत झालेल्या पराभवानंतर मनोज परब अचनाक गायब झाले होते. दरम्यान, ते मोठ्या कालावधीसाठी विश्रांतीवर गेल्याची माहिती समोर आलीय. विश्रांतीवरुन आल्यानंतर परबांनी एका फेसबुक पोस्टद्वारे नवे संकेत दिले आहे. मनोज परब यांनी लेट्स रिव्होल्यूशन #२०२५ अशी पोस्ट करत पोस्टमध्ये फुटबॉल हे पक्षाचे चिन्ह दिले आहे.
परब नक्की कोणत्या रिव्होल्यूनची वाच्यता करतायेत याबाबत काही महिती समोर आली नसली तरी, येत्या काळात राज्यात पक्ष संघटन मजबूत करणे, पदाधिकाऱ्यांची नवी फौज तयार करणे आणि विविध मुद्यांवर सरकारला घेरणे असे मुद्दे त्यांच्या अजेंड्यावर असू शकतात.
सरत्या वर्षांत राज्यात समोर आलेल्या कॅश फॉर जॉब स्कॅम सारख्या प्रकरणावरुन देखील आरजी सरकारला घेरू शकते. आगामी विधानसभेच्या हिवाळी अधिवेशनात पक्षाचे एकमेव आमदार वीरेश बोरकर यावर भाष्य करण्याची शक्यता आहे.
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.