Nanoda: आम्हाला पाणी द्या! नानोड्यात महिलांचा आक्रोश; घागरमोर्चा काढण्‍याचा इशारा

Nanoda Sattari Water Problem Protest: नानोडा-सत्तरी येथे पाणीपुरवठा खात्याची सार्वजनिक विहीर सहा महिन्यापूर्वी जोरदार पावसाच्या तडाख्यात जमीनदोस्त झाली.
Nanoda Sattari Water Problem
Nanoda Sattari Protest for Water ProblemDainik Gomantak
Published on
Updated on

Nanoda Sattari Protest for Water Problem

वाळपई: नगरगाव पंचायत क्षेत्रातील नानोडा-बांबर, सत्तरीत सुरळीत पाणीपुरवठा करावा, यासाठी आज मंगळवारी नानोडा -बांबर येथील महिलांनी पाणीपुरवठा कार्यालयावर धडक मोर्चा आणला आणि दहा दिवसांत पाणीपुरवठा सुरळीत न केल्यास घागरमोर्चा काढण्याचा इशारा दिला. तेव्हा कनिष्ठ अभियंता नेहाल पाटणेकर यांनी पाणीपुरवठा सुरळीत करण्याचे आश्‍वासन दिले.

नानोडा-सत्तरी येथे पाणीपुरवठा खात्याची सार्वजनिक विहीर सहा महिन्यापूर्वी जोरदार पावसाच्या तडाख्यात जमीनदोस्त झाली. त्यामुळे गावातील नागरिकांवर जलसंकट आले. दरम्यान, शेतकरी विष्णू जोशी यांनी स्वतःच्या विहिरीत पाइपलाइन बसवून पाणीपुरवठा सुरू केला. पण पावसाळ्यानंतर बागायतीसाठी पाण्याची आवश्‍यकता भासत असल्याने गावाचा पाणीपुरवठा बंद केला.

त्यामुळे अलीकडे टँकरने पुरवठा केला जात होता. मात्र उंच भागात पाणी पुरवठा होत नाही. त्यामुळे पाण्यासाठी नदीवर अवलंबून राहावे लागत आहे. त्यामुळे महिलावर्गाने पूर्वीची विहीर दुरुस्त करून आम्हांला पाणीपुरवठा करा, अशी मागणी आज पाणीपुरवठा कार्यालयावर मोर्चा नेऊन केली. त्यावेळी विहीर दुरुस्तीचे आश्‍वासन दिले.

Nanoda Sattari Water Problem
Goa Water Crisis: ‘व्हडली दिवाळी’ला पाणी-बाणी; बोर्डेत गृहिणींचे हाल, तुळशी विवाहाच्या तयारीत अडचणी

यावेळी महिला प्रतिनिधी म्हणाल्या, सहा महिन्यापासून पाण्यासाठी आम्हांला हाल सहन करावे लागत आहेत. सार्वजनिक विहीर कोसळल्यानंतर अजूनपर्यंत खात्याने ती दुरुस्त केलेली नाही. यासंबंधी आम्ही कित्येक वेळा खात्याला जाब विचारला आहे. प्रत्येक वेळी आश्‍वासन देण्यात आले, पण कृती काहीच केली नाही.

अनेक वेळा आम्ही खात्याच्या अधिकाऱ्यांकडे जाब विचारला, त्यावेळी आम्ही या संबंधीची फाईल पुढे पाठविलेली आहे, मात्र ती अद्याप पास झालेली नाही, असे सांगण्यात आले. आम्हांला टॅंकरचे पाणी नको, त्या पाण्यामुळे सुध्दा आम्हांला खूप त्रास होतो. काहींना पाणी मिळते, तर काहींना नाही. तसेच गावातील काहींची घरे उंचावर आहे. त्यामुळे टॅंकरचे पाणी नेणार कसे? हा मोठा प्रश्न आहे, असेही महिलावर्गातर्फे सांगण्यात आले.

Nanoda Sattari Water Problem
Water Supply Scheme: पाणीप्रश्नावर राज्य 'गंभीर'! पुरवठा योजनेचा मास्टर प्लॅन तयार; अनेक गावांची तहान भागणार

म्‍हादई नदीचे पाणी दूषित

नानोडा हा निसर्गरम्य गाव आहे आणि या गावात मोठ्या प्रमाणात पर्यटक सहलीसाठी येतात. नदीच्या ठिकाणी आंघोळ करतात, त्यामुळे आमची म्हादई दूषित झाली आहे आणि हेच दूषित झालेले पाणी आम्हांला प्यावे लागते. पिण्यापासून ते आंघोळ, कपडे धुण्यासाठीही वापरावे लागते. बरेच महिने आम्ही हा त्रास सहन केला, पण आत्ता करणे शक्य नाही, दहा दिवसांत उपाययोजना न केल्यास पुन्हा घागर मोर्चा काढण्यात येईल, असे महिलांनी अभियंत्यांना सांगितले.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com