Manoj Parab Dainik Gomantak
गोवा

Goa Taxi : कन्नड महासंघाच्या कार्यक्रमाला जाणारे मुख्यमंत्री स्थानिकांचे प्रश्न कधी सोडवणार? मनोज परबांचा टोला

मुख्यमंत्र्यांना कन्नडिगांच्या कार्यक्रमाला जाण्यास वेळ आहे मात्र टॅक्सीचालकांना भेटण्यासाठी मुख्यमंत्री व्यस्त असल्याची टीका त्यांनी केली आहे.

आदित्य जोशी

गोव्यात सध्या टॅक्सीचालकांचा वाद सध्या चांगलाच चर्चेत आहे. आज पेडण्यात टॅक्सीचालकांनी मोपावरील टॅक्सी काऊंटरसाठी आंदोलनाचं हत्यार उपसलं आहे. पेडण्याचे आमदार प्रवीण आर्लेकरही या आंदोलनात दिसून आले. आता रिव्हॉल्युशनरी गोवन्स पक्षाचे सर्वेसर्वा मनोज परब यांनी मुख्यमंत्र्यांवर टॅक्सीचालकांच्या प्रश्नावरुन टीकास्त्र सोडलं आहे. मुख्यमंत्र्यांना कन्नडिगांच्या कार्यक्रमाला जाण्यास वेळ आहे मात्र टॅक्सीचालकांना भेटण्यासाठी मुख्यमंत्री व्यस्त असल्याची टीका त्यांनी केली आहे.

मोपा आंतरराष्ट्रीय विमानतळ सुरू व्हायच्या आधीपासूनच विमानतळावर टॅक्सी काउंटर व्हावे अशी मागणी जोर धरत होती. यासाठी वेळोवेळी सरकारकडे टॅक्सी चालकांची समिती पाठपुरावा करत होती. काळ्या-पिवळ्या टॅक्सीधारकांना काउंटर सुरू करावा, तो मिळवणे हा स्थानिकांचा हक्क आहे, असा सूर उमटत होता. यासंदर्भात आंदोलन करण्याचा इशाराही टॅक्सीधारकांनी दिला होता.

2 तारखेपासून नागझर येथे सुरू होणाऱ्या आंदोलनास पूर्ण पाठिंबा असेल, असे पेडणे तालुका नागरिक समितीतर्फे आयोजित पत्रकार परिषद जाहीर करण्यात आले. मोपा विमानतळावर टॅक्सी काउंटरची मागणी करत शेकडो टॅक्सी मालकांनी पेडणे येथे आंदोलनाला सुरुवात केली आहे. आमदार प्रवीण आर्लेकर हेही आंदोलनात दिसले.

प्रवीण आर्लेकरांनी यावेळी म्हणाले की, 'मी सर्व टॅक्सीचालक बांधवांसोबत आहे. त्यांच्या मागण्या मी सरकारदरबारी पोहोचवत आहे. मोपा विमानतळावर टॅक्सी काउंटर व्हावे यासाठी मी मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांच्याशी चर्चा केली आहे.'

दरम्यान, पेडणे तालुका नागरिक समितीचे समितीचे अध्यक्ष भरत बागकर म्हणाले होते की, या विमानतळासाठी सरकारने स्थानिक शेतकऱ्यांच्या शेती, बागायतीची जमीन ताब्यात घेतली. या मोबदल्यात स्थानिकांना नोकरीसाठी प्राधान्य देण्यात येईल, असे सांगितले होते, पण प्रत्यक्षात मात्र सरकारने आश्वासन देऊन लोकांचा विश्वासघात केला. सरकारने किमान मोपा विमानतळावर पेडणेतील युवकांना टॅक्सी व्यवसाय सुरू करण्यासाठी काउंटर उपलब्ध करायला हवा. टॅक्सीचालकांच्या या आंदोलनावर आता सरकार काय भूमिका घेणार हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Yemen Saudi Arabia Missile Attack: यमनचा सौदीवर मोठा हल्ला! हवाई अड्डे उद्ध्वस्त, रिफायनरीतून आगीचे लोट; कोट्यवधींचे नुकसान

Talha Saeed Anti India Speech: ''दिल्ली कुणाची होती विसरलात का?" हाफिज सईदच्या लेकानं भारताविरोधात ओकली गरळ; तल्हा सईदच्या रॅलीनं वादंग VIDEO

Goa Ashtami Fair: 'अष्टमी'च्या फेरीने मांडवी किनारा गजबजला! कार्यालये सुटताच गर्दीला उधाण; कपड्यांच्या खरेदीला सर्वाधिक पसंती

India Defence Deal: चीन-पाकिस्तानचा थरकाप उडणार! भारतीय सैन्याची ताकद अनेक पटींनी वाढणार; 1.10 लाख कोटींच्या संरक्षण कराराला मोदी सरकारची मंजुरी

Collared Kingfisher Research: गोव्याच्या किनारी परिसंस्थेसाठी 'कॉलर्ड किंगफिशर'चा अभ्यास! MFG- GBCNचा संयुक्त संशोधन प्रकल्प; पक्ष्याबाबत मिळविणार माहिती

SCROLL FOR NEXT