Taxi Driver Protest
Taxi Driver ProtestDainik Gomantak

Taxi Driver Protest : मोठी बातमी! मोपावर टॅक्सी काऊंटरसाठी टॅक्सीचालकांचा एल्गार; आमदारही सहभागी

मोपा विमानतळावर टॅक्सी काउंटरची मागणी करत शेकडो टॅक्सी मालकांनी पेडणे येथे आंदोलनाला सुरुवात केली आहे.

मोपा आंतरराष्ट्रीय विमानतळ सुरू व्हायच्या आधीपासूनच विमानतळावर टॅक्सी काउंटर व्हावे अशी मागणी जोर धरत होती. यासाठी वेळोवेळी सरकारकडे टॅक्सी चालकांची समिती पाठपुरावा करत होती. काळ्या-पिवळ्या टॅक्सीधारकांना काउंटर सुरू करावा, तो मिळवणे हा स्थानिकांचा हक्क आहे, असा सूर उमटत होता. यासंदर्भात आंदोलन करण्याचा इशाराही टॅक्सीधारकांनी दिला होता.

Taxi Driver Protest
Goa Electricity: भूमिगत वीज वाहिन्यांनी पालिका, कृषी क्षेत्र, किनारीपट्टी जोडणार- सुदिन ढवळीकर

2 तारखेपासून नागझर येथे सुरू होणाऱ्या आंदोलनास पूर्ण पाठिंबा असेल, असे पेडणे तालुका नागरिक समितीतर्फे आयोजित पत्रकार परिषद जाहीर करण्यात आले. मोपा विमानतळावर टॅक्सी काउंटरची मागणी करत शेकडो टॅक्सी मालकांनी पेडणे येथे आंदोलनाला सुरुवात केली आहे. आमदार प्रवीण आर्लेकर हेही आंदोलनात दिसले.

प्रवीण आर्लेकरांनी यावेळी म्हणाले की, 'मी सर्व टॅक्सीचालक बांधवांसोबत आहे. त्यांच्या मागण्या मी सरकारदरबारी पोहोचवत आहे. मोपा विमानतळावर टॅक्सी काउंटर व्हावे यासाठी मी मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांच्याशी चर्चा केली आहे.'

दरम्यान, पेडणे तालुका नागरिक समितीचे समितीचे अध्यक्ष भरत बागकर म्हणाले होते की, या विमानतळासाठी सरकारने स्थानिक शेतकऱ्यांच्या शेती, बागायतीची जमीन ताब्यात घेतली. या मोबदल्यात स्थानिकांना नोकरीसाठी प्राधान्य देण्यात येईल, असे सांगितले होते, पण प्रत्यक्षात मात्र सरकारने आश्वासन देऊन लोकांचा विश्वासघात केला. सरकारने किमान मोपा विमानतळावर पेडणेतील युवकांना टॅक्सी व्यवसाय सुरू करण्यासाठी काउंटर उपलब्ध करायला हवा. टॅक्सीचालकांच्या या आंदोलनावर आता सरकार काय भूमिका घेणार हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

दैनिक गोमन्तक आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, इन्स्टाग्राम, ट्विटर, शेअर चॅट आणि टेलिग्राम आम्हाला फॉलो करा. तसेच, दैनिक गोमन्तकच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Dainik Gomantak | दैनिक गोमन्तक
dainikgomantak.esakal.com