Mhadei Water Dispute Dainik Gomantak
गोवा

RG On Mhadei: म्हादई वाचवण्यासाठी 'मोदी की गॅरंटी' द्या; मोदींनी गोव्यात सभा घ्यावी - मनोज परब

Revolutionary Goans On Mhadei: म्हादई नदीच्या पाणीप्रश्नावर चर्चा करण्यासाठी केवळ एकदाच सभागृह समितीची बैठक झाली, अशी माहिती वीरेश बोरकर यांनी दिली

Pramod Yadav

Revolutionary Goans On Mhadei

म्हादई नदी वाचवण्यासाठी भाजप सरकारने गोवावासीयांसाठी 'मोदी की गॅरंटी' देण्याची गरज आहे, अशी मागणी रिव्होल्युशनरी गोवन्स पक्षाचे अध्यक्ष मनोज परब यांनी केली.

तसेच म्हादई नदीच्या पाणीप्रश्नावर चर्चा करण्यासाठी केवळ एकदाच सभागृह समितीची बैठक झाली, अशी माहिती सांतआंद्रेचे आमदार वीरेश बोरकर यांनी दिली

दोन दिवसांपूर्वी प्रसिद्ध पर्यावरणवादी राजेंद्र केरकर यांनी सोशल मीडियावर एक व्हिडिओ प्रसिद्ध केला होता, ज्यात अलीकडेच खंदकांचा विकास आणि गोव्यातील म्हादई नदीच्या पाण्याचा प्रवाह कमकुवत करण्यासाठी कर्नाटक सरकारकडून कळसा-भांडुरा प्रकल्पावर काम सुरू केल्याचे त्यांनी दर्शविले आहे. या मुद्यावर रिव्होल्युशनरी गोवन्सने गुरुवारी (ता. २१) पत्रकार परिषद घेतली.

काळसा उपनदीचे पाणी मलप्रभा खोऱ्यात वळवण्यासाठी कर्नाटकने कालवे खोदल्याचा पर्यावरणवाद्यांनी पर्दाफाश केल्याचा दावा परब यांनी यावेळी केला.

पंतप्रधान मोदींनी गोव्यात जाहीर सभा घेऊन म्हादई नदीचे पाणी वळवले जाणार नाही, असे आश्वासन गोव्यातील जनतेला द्यावे, असे परब म्हणाले.

सुरुवातीला गोवा फॉरवर्डच्या वतीने हा मुद्दा उपस्थित केला होता. पक्षाचे प्रमुख विजय सरदेसाई यांनी सरकारच्या वतीने म्हादईवर त्वरित निवेदन प्रसिद्ध करण्याची मागणी केली होती.

सरकार म्हादईबाबत सरकार बहिरे, आंधळे आणि मुके असल्यासारखे वागत आहे, असे सरदेसाई यांनी प्रसिद्धीस दिलेल्या पत्रकात म्हटले आहे.

कर्नाटकने पावसाळ्यातील पाण्याचा प्रवाह कळसा- भांडुरा प्रकल्पाच्या दिशेने वळवण्याचे काम पुन्हा सुरू केले आहे.

केरी-सत्तारी येथील विवेकानंद पर्यावरण जागरूकता ब्रिगेडच्या स्वयंसेवकांनी नुकतीच कणकुंबीला भेट दिली असता, तपासणी बंगल्याच्या परिसरात बांधलेल्या नाल्यात पाणी वाहून जाण्यासाठी खोल वाहिन्या खोदण्यात आल्याचे त्यांच्या निदर्शनास आले.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Sunburn Festival 2025: बरं झालं! सनबर्न गोव्याबाहेर गेल्यावर मंत्री नाईकांची प्रतिक्रिया; म्हणाले, आपली संस्कृती-परंपरा सुरक्षित राहील

Ravichandran Ashwin: 'तुम्ही जे पेराल ते उगवेल'! स्टोक्सच्या 'मस्करी'ला अश्विनचे सडेतोड उत्तर; जाणून घ्या नेमके प्रकरण?

Numerology: जन्मतारखेत दडलेय 'कर्माचे फळ'; या तारखांना जन्मलेल्यांना संघर्ष आणि यशासाठी वाट का पहावी लागते?

West Nile Virus: वेस्ट नाईल व्हायरसने जगभरात वाढवली चिंता! लहान मुलांना सर्वाधिक धोका; जाणून घ्या लक्षणे आणि खबरदारीचे उपाय

Goa Fish Export:"सद्या श्रावण सुरु आसा, हांवूंय नुस्ते खायना" मासे निर्यातीवरून LOP आलेमाव आणि CM सावंतमध्ये रंगला कोकणी संवाद; Watch Video

SCROLL FOR NEXT