Australia Out Of T20 World Cup 2026
Australia Out Of T20 World Cup 2026Dainik Gomantak

T20 World Cup 2026: विश्वचषकात मोठा उलटफेर! लागोपाठ दोन पराभव अन् पावसाचा फटका; कांगारुंचं पॅकअप, झिम्बाब्वेची सुपर-8 मध्ये एन्ट्री

Australia Out Of T20 World Cup 2026: टी-20 विश्वचषक 2026 मध्ये मंगळवारी (17 फेब्रुवारी) एक फार मोठा आणि धक्कादायक उलटफेर पाहायला मिळाला.
Published on

Australia Out Of T20 World Cup 2026: टी-20 विश्वचषक 2026 मध्ये मंगळवारी (17 फेब्रुवारी) एक मोठा आणि धक्कादायक उलटफेर पाहायला मिळाला. क्रिकेटविश्वातील बलाढ्य संघ मानला जाणारा ऑस्ट्रेलिया साखळी फेरीतच स्पर्धेतून बाहेर गेला. झिम्बाब्वे आणि आयर्लंड यांच्यात पल्लेकेले आंतरराष्ट्रीय क्रिकेट स्टेडियमवर होणारा महत्त्वाचा सामना पावसामुळे रद्द झाल्याने ग्रुप बी मधील समीकरण पूर्णपणे बदलले. ऑस्ट्रेलिया स्पर्धेतून बाहेर पडल्याचा थेट फायदा झिम्बाब्वेला झाला. झिम्बाब्वेने सुपर-8 मध्ये दिमाखात प्रवेश केला. अशाप्रकारे ऑस्ट्रेलिया आणि आयर्लंड यांचे स्पर्धेतील आव्हान आता अधिकृतरित्या संपुष्टात आले.

झिम्बाब्वेचा संघ या स्पर्धेत आतापर्यंत अपराजित राहिला असून आयर्लंडविरुद्धचा सामना पावसामुळे वाहून गेल्याने त्यांना एक गुण मिळाला. यामुळे 3 सामन्यांत 5 गुणांसह झिम्बाब्वेने सुपर-8 मधील आपले स्थान निश्चित केले. या गटातून श्रीलंका आणि झिम्बाब्वे हे दोन संघ आता पुढच्या फेरीत दाखल झाले आहेत. ऑस्ट्रेलियासारखा (Australia) बलाढ्य संघ इतक्या लवकर स्पर्धेतून बाहेर पडणे हा क्रिकेट चाहत्यांसाठी मोठा धक्का मानला जात आहे. झिम्बाब्वेने दाखवलेली जिद्द आणि सातत्यपूर्ण कामगिरीमुळे त्यांना ही सुवर्णसंधी मिळाली असून आता ते जगातील सर्वोत्तम संघांशी भिडणार आहेत.

Australia Out Of T20 World Cup 2026
T20 World Cup 2026: पाकिस्तानची दाणादाण! टीम इंडियाने मैदानावर उडवला विजयाचा गुलाल

सुपर-8 फेरीसाठी झिम्बाब्वेचा समावेश आता 'ग्रुप 1' मध्ये झाला आहे. या गटात त्यांच्यासमोर भारत, दक्षिण आफ्रिका आणि वेस्ट इंडिज यांसारख्या तगड्या संघांचे आव्हान असणार आहे. झिम्बाब्वेने ऑस्ट्रेलियाची 'X2' जागा घेतली असून आता त्यांना उपांत्य फेरी गाठण्यासाठी या तिन्ही मोठ्या संघांविरुद्ध मैदानात उतरावे लागेल. झिम्बाब्वेच्या या अनपेक्षित यशामुळे स्पर्धेत मोठी रंगत निर्माण झाली असून छोट्या मानल्या जाणाऱ्या संघांनी दाखवलेला हा खेळ टी-20 क्रिकेटमधील अनिश्चितता पुन्हा एकदा सिद्ध करतो.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa News in Marathi - Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com