Liquor Smuggling: गोव्यातून गुजरातला 50 लाखांची मद्य तस्करी, डिस्टीलरी संचालकासह वाईन शॉप मालकास अटक

Goa To Gujrat Liquor Smuggling Case: नवसारीजवळ 9 मार्च रोजी राज्य मॉनिटरिंग सेलने (SMC) ट्रकमधून वाहतूक केली जाणारी दारू जप्त केली.
Goa To Gujrat Liquor Smuggling Case
Goa To Gujrat Liquor Smuggling CaseDainik Gomantak
Published on
Updated on

Liquor Smuggling

गुजरातमध्ये 50.40 लाख रुपयांची दारू तस्करी केल्याप्रकरणी नवसारी स्थानिक गुन्हे शाखेने (LCB) गोव्यातील एका डिस्टिलरीच्या संचालक आणि वाईन शॉप मालकाला अटक केलीय.

नवसारीजवळ 9 मार्च रोजी राज्य मॉनिटरिंग सेलने (SMC) ट्रकमधून वाहतूक केली जाणारी दारू जप्त केली.

एलसीबीच्या अधिकाऱ्यांनी गोव्यात अनेक वाईन शॉप्स असलेल्या फ्रान्सिस डायगो मायकल डिसोझा आणि डिस्टिलरी मालक मनीष मिश्रा यांना 19 मार्च रोजी अटक केली. दोघांनाही गोव्यातून अटक करण्यात आली असून, त्यांना 26 मार्चपर्यंत पोलिस कोठडी सुनावण्यात आली आहे.

यासह पोलिसांनी विक्रम भिल या वाहन चालकाला देखील अटक केली आहे. विक्रमने गोवा ते पंचाम्हलपर्यंत वाहनाला एस्कॉर्ट केले होते.

फ्रान्सिस डिसोझा यांने डिस्टिलरी मालक मनीष मिश्रा यांच्याकडून मद्याची खरेदी केली आणि राजस्थानमधील सुरेश बिष्णोई याला विक्री केली होती. बिष्णोईने गोध्रा येथील रमेश वेणकर याला ट्रकमधून मद्याची पाठवणी केली असता, त्याची मॉनिटरिंग सेलला माहिती मिळली. सेलच्या अधिकाऱ्यांनी ट्रकची तपासणी करुन संशयितांना ताब्यात घेत, मद्यसाठा जप्त केला.

Goa To Gujrat Liquor Smuggling Case
Goa Congress: समन्वय समितीचा पत्ता नाही, केव्हा होणार काँग्रेस उमेदवार जाहीर? शरद पवारांची राष्ट्रवादी नाराज

मद्याच्या बाटच्या रॉयल ब्ल्युच्या नावाने पॅकबंद करण्यात आल्या होत्या. मॉनिटरिंग सेलच्या छापेमारीनंतर नवासरी ग्रामीण पोलिस ठाण्यात गुन्हा नोंद करण्यात आला होता. त्यानंतर स्थानिक गुन्हे शाखा याप्रकरणाचा पुढील तपास करत होती.

पोलिसांनी अटक केलेल्या फारूख मोयला याने तस्करी केले जाणारे मद्य बिष्णोई याने फ्रान्सिस आणि मिश्रा यांच्याकडून मागविल्याचे सांगितले. तसेच, त्याची तस्करी गोध्रा तालुक्यातील रामपुरा गावात केली जाणार होती.

दरम्यान, अटक करण्यात आलेल्या वाईन शॉप मालक फ्रान्सिस (रा. नावेली) याचे गोव्यात चार वाईन शॉप असल्याचे समोर आले आहे. तर, साळगावच्या मिश्रा रॉयल ब्ल्यु नावाने डिस्टिलरी चालवतात.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

Devasa Quepem Cow Shelter Sheds Demolished
Goa Mumbai Highway Liquor Seizure
Jharkhand Native Arrested With Drugs In Goa
ED Attaches Hotel Westin Goa
Goa News in Marathi - Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com