Revolutionary Goans Manoj Parab Dainik Gomantak
गोवा

रेव्होल्युशनरी गोवन पार्टी पंचायत निवडणुकांच्या तयारीत

विधानसभेत गोमंतकीयांचा आवाज पोहोचविणार: मनोज परब

दैनिक गोमन्तक

सासष्टी: विधानसभेच्या निवडणुकीत अपेक्षेपेक्षा जास्त यश संपादन केलेला रेव्होल्युशनरी गोवन पार्टी हा पक्ष आंता पंचायत निवडणुकांच्या तयारीला लागला आहे. पंचायत निवडणुका पक्षीय स्तरावर जरी होणार नसल्या तरी आपला पक्ष या निवडणुकांमध्ये योग्य त्या उमेदवाराला पाठिंबा जाहीर करील व त्याची यादी पुढील आठवडापर्यंत जाहीर केली जातील असे रेव्होल्युशनरी गोवन पार्टीचे अध्यक्ष मनोज परब यानी मडगावात आज पत्रकारांशी बोलताना स्पष्ट केले.

(Revolutionary Goan Party in preparation for Panchayat elections)

विधानसभेच्या निवडणुकीत स्मार्ट व्हिलेज ही संकल्पना आपल्या पक्षाने जाहीरनाम्यात नमुद केली होती. त्याच अनुषंगाने आम्ही पंचायत निवडणुकांमध्ये जिथे जिथे आपल्या पक्षाला जास्त पाठिंबा मिळू शकेल असे प्रभाग शोधून तेथे पक्षाच्या विचारांकडे सहमत असलेल्या उमेदवाराला पाठिंबा जाहीर केला जाईल असे परब यानी सांगितले.

पंचायत स्तरावरील प्रशासन आम्हाला स्वच्छ करायचे आहे. सर्व पंचायतीना आम्हाला स्वयंपुर्ण करायचे आहे. पंचायत हा लोकशाहीचा पाया आहे व हा पाया मजबुत करण्याचा आमचा प्रयत्न राहील असेही परब पुढे म्हणाले. पण एक मात्र खरे आपला पक्ष 100 टक्के प्रत्यक्ष नाही तरी अप्रत्यक्षपणे पंचायत निवडणुकांच्या रिंगणात उतरणार असल्याचे परब यानी ठामपणे सांगितले.

सोमवारपासुन सुरु होणाऱ्या विधानसभेत आमचा एकमेव आमदार गोमंतकीयांचा आवाज पोहोचविणार आहे. आम्ही कित्येक विधेयके, ठराव विधानसभेसाठी पाठविले होते. मात्र विधानसभेचा कार्यकाल 25 वरुन 10 दिवसांवर आणल्याने आम्हाला या सर्वाचा पुर्नविचार करावा लागत आहे.

पोगो विधेयक हे गोमंतकीयांची खरी ओळख दर्शविणारे आहे. खरा गोमंतकीय कोण हे स्पष्ट व्हायला पाहिजे व ते स्पष्ट करण्याची जबाबदारी सरकारची आहे. परराज्यातील लोक इथे येऊन स्वताला गोमंतकीय म्हणत आहेत. हे आम्ही कसे खपवुन शकता0 असा प्रतिप्रश्र्न करुन मनोज परब म्हणाले की जर सरकार गंभीर आहे तर त्यानी या विधेयकाला पाठिंबा दिला पाहीजे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

BJP: इतिहासात पहिल्यांदाच भाजपच्या राष्ट्रीय अध्यक्षपदाची सूत्रे महिलेकडे जाणार? RSS चा ग्रीन सिग्नल; 'ही' तीन नावे चर्चेत

Operation Sindoor: 'भारत पाकिस्तानसोबत चीनशीही लढत होता...' ऑपरेशन सिंदूरबाबत भारतीय उप सेनाप्रमुखांचे मोठे वक्तव्य

Goa News Live: ओपा जल शुद्धीकरण प्रकल्पाजवळ ट्रक दरीत कोसळला

Goa Athletics: गोव्यात रंगणार 'मनोहर पर्रीकर स्मृती ॲथलेटिक्स स्पर्धा'; तारखा, ठिकाण जाणून घ्या..

Pakistani Team: 'पाकिस्तान' टीम खेळणार भारतात! क्रीडा मंत्रालयाकडून ग्रीन सिग्नल; 2 करंडकांमध्ये घेणार भाग

SCROLL FOR NEXT