दिगंबर कामत यांच्या नेतृत्वाखाली आठ काँग्रेस आमदार भाजपच्या वाटेवर

भाजपच्या वरिष्ठ नेत्यांशी चर्चा केली असून पक्षश्रेष्ठींनी त्यांच्या पक्षाला हिरवा कंदील दाखवला आहे.
Goa Congress MLA
Goa Congress MLADainik Gomantak
Published on
Updated on

पणजी: माजी मुख्यमंत्री दिगंबर कामत यांच्या नेतृत्वाखाली कॉंग्रेस विधिमंडळाचा एक गट फुटून भाजपमध्ये जाणार असल्याची खळबळजनक माहिती मिळाली आहे. कामत गेल्या काही दिवसांपासून कॉंग्रेसमध्ये नाराज होते. तेच आता या फुटीरतावाद्यांचे नेतृत्व करत असून गेल्या काही दिवसांपासून ते दिल्लीत ठाण मांडून बसले आहेत. यादरम्यान त्यांनी भाजपच्या वरिष्ठ नेत्यांशी चर्चा केली असून पक्षश्रेष्ठींनी त्यांच्या पक्षाला हिरवा कंदील दाखवला आहे.

(Under the leadership of Digambar Kamat, eight goa Congress MLAs will join the BJP)

Goa Congress MLA
Corona Update: मागील 24 तासात 111 नव्या रूग्णांची भर; एकाचा मृत्यु

सोमवारपासून राज्यात विधानसभेचे अर्थसंकल्पीय अधिवेशन सुरू होत आहे. या पार्श्‍वभूमीवर कॉंग्रेसला पुन्हा खिंडार पडणार, अशी खळबळजनक माहिती उपलब्ध झाली असून या गटाचे नेते दिगंबर कामत हे आहेत. त्यांचा भाजप प्रवेश कोणत्याही क्षणी होऊ शकतो. त्याला दिल्ली श्रेष्ठींनी मान्यता दिली. मात्र, या पक्षबदलाच्या किंवा पक्षफुटीच्या घडामोडींपासून राज्य भाजपला पूर्णत: बाजूला ठेवले आहे.

मात्र, मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत किंवा मंत्री विश्वजीत राणे दोघेही कॉंग्रेस आमदारांना प्रवेश देण्यास अनुकूल नव्हते. अखेर पक्षश्रेष्ठींचा आदेश म्हणून त्यांनी या बाबीला मान्यता दिली आहे. या घडामोडींमुळे कॉंग्रेसबरोबर भाजपमध्येही खळबळ तर होईलच, याशिवाय असंतोषही वाढण्याची शक्यता आहे. सध्या मंत्रिमंडळातील मंत्रिपदे, महामंडळांची अध्यक्षपदे वाटून काहीशी स्थिरस्थावर झाली असतानाच या नव्या घडामोडींमुळे नाराजीचा सूर वाढण्याची शक्यता आहे.

Goa Congress MLA
खराब हवामानामुळे गोवा विमानतळावरील उड्डाणे वळवण्यात आली

ते आठजण कोण?

दिगंबर कामत यांनी या भाजप प्रवेशाची माहिती स्थानिक आमदारांना दिली असून पक्षप्रवेशासाठी तयार राहा, अशी सूचना दिल्याने कॉंग्रेसमध्ये खळबळ उडाली आहे. भाजपमध्ये प्रवेश करणारे हे आठजण कोण, हा विषय चर्चेचा असून कॉंग्रेसमधील प्रत्येकाकडे संशयाने पाहिले जात आहे. सध्या कॉंग्रेसकडे 11आमदार असून यापैकी 8 आमदार भाजपमध्ये गेल्यास कॉंग्रेसकडे केवळ तीन आमदार उरणार आहेत. त्यामुळेच सध्या विरोधी पक्ष गोटात चर्चेला उधाण आले आहे.

सरकार होणार अधिक भक्कम

महाराष्ट्रात महाविकास आघाडीला दणका देत शिवसेनेचे बंडखोर नेते एकनाथ शिंदे यांनी शिवसेना आपल्या हातात घेण्याचा प्रयत्न करत मुख्यमंत्री पद मिळवले आहेे. आज शिंदे यांनी देवेंद्र फडणवीस यांच्यासमवेत पंतप्रधान नरेंद्र मोदी, जे.पी. नड्डा आणि अमित शहा यांची भेट घेतली. या पार्श्‍वभूमीवर गोव्यातील घडामोडींना वेग आला आहे. अर्थात, गोव्यात डॉ. प्रमोद सावंत यांच्या नेतृत्वाखाली बहुमताचे सरकार असून त्यांना कॉंग्रेसमधील फुटीर आमदारांचे समर्थन मिळाल्यास सरकार अधिक भक्कम होईल, इतकाच काय तो बदल होणार आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com