Fire Dainik Gomantak
गोवा

Revoda Fire: AC मध्ये झाले शॉर्टसर्किट, फ्लॅटला लागली आग; 6 लाखांचे नुकसान, 2 युवती जखमी Video

Goa Fire: रेवोडा येथील एका इमारतीच्या तिसऱ्या मजल्यावरील फ्लॅटला गुरुवारी (ता.४) पहाटे आग लागण्याची घटना उघडकीस आली. यात दोघी युवती किरकोळ जखमी झाल्या.

गोमन्तक डिजिटल टीम

म्हापसा: रेवोडा येथील एका इमारतीच्या तिसऱ्या मजल्यावरील फ्लॅटला गुरुवारी (ता.४) पहाटे आग लागण्याची घटना उघडकीस आली. यात दोघी युवती किरकोळ जखमी झाल्या. कांचन आसुदली (२३, रा. मूळ बंगळूरू) व प्रिया सेन (२५, रा. बिहार) अशी जखमी झालेल्या युवतींची नावे आहेत.

त्यांना धुरामुळे श्वास घेण्यास त्रास जाणवत होता. ही आग एअर-कंडिशनिंग युनिटमध्ये झालेल्या शॉर्ट सर्किटमुळे लागली असावी, असा प्राथमिक अंदाज आहे. उपलब्ध माहितीनुसार, आग लागली तेव्हा दोघी युवती खोलीत झोपल्या होत्या.

यावेळी आजूबाजूच्या सतर्क शेजाऱ्यांनी प्रसंगावधान दाखवत, युवतींना फ्लॅटमधून सुखरूप बाहेर काढले. या बचाव कार्यात एका स्थानिकालाही किरकोळ दुखापत झाली. जखमी युवतींना म्हापसा जिल्हा रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले.

या आगीची माहिती मिळताच, म्हापसा अग्निशमन दलाचे पथक घटनास्थळी पोहचले व त्यांनी या आगीवर नियंत्रण मिळवले. या आगीत फ्लॅटमधील वस्तू मोठ्याप्रमाणात जळून खाक झाल्या. सुमारे ५ ते ६ लाखांचे नुकसान झाले आहे. कोलवाळ पोलिसांकडून तपास सुरू आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Abhang Repost: ‘चल ग सखे... पंढरीला'! म्‍हापशात ‘अभंग रिपोस्‍ट’चा जल्लोष; भक्तिरसात न्हाले शहर

World Soil Day: चिंताजनक! 2045 पर्यंत पृथ्वीवर 40% कमी अन्न तयार होण्याची शक्यता; गोव्यासमोरही मोठी समस्या..

गोवा – मुंबई फ्लाईटच्या तिकिटासाठी मोजले 4 लाख रुपये, गायक राहुल वैद्यला इंडिगोच्या विस्कळीत विमानसेवेचा फटका

Weekly Horoscope 2025: पैसा ही पैसा! 'या' तीन राशींचे लोक होणार मालामाल, बँक बॅलन्स बघून जळतील शेजारी; वाचा 'सुपर वीक'चा प्लॅन

Goa ZP Election: बोरीत भाजपमध्ये बंडाळीची शक्यता, आरक्षणावरून नाराजी, ‘आरजी’ही अग्रेसर; काँग्रेस ढिम्मच

SCROLL FOR NEXT