Nessai Industrial Estate Fire
Goa Factory FireDainik Gomantak

Goa Factory Fire: नेसाई औद्योगिक वसाहतीतील फॅक्टरीला भीषण आग! अग्निशमन दलाच्या तत्परतेने वाचली 10 लाखांची मालमत्ता; मोठा अनर्थ टळला

Nessai Industrial Estate Fire: नेसाई औद्योगिक वसाहत येथील एका कारखान्याच्या बंद युनिटला अचानक आग लागल्याची धक्कादायक घटना समोर आली.
Published on

Nessai Industrial Estate Fire: नेसाई औद्योगिक वसाहत येथील एका कारखान्याच्या बंद युनिटला अचानक आग लागल्याची धक्कादायक घटना समोर आली. मात्र, मडगाव अग्निशमन दलाच्या जवानांनी तातडीने घटनास्थळी धाव घेऊन आग विझवल्याने मोठे नुकसान टळले. या तत्परतेमुळे तब्बल 10 लाखांची मालमत्ता वाचवण्यात यश आले.

आग आणि बचावकार्य

नेसाई औद्योगिक वसाहतीमधील एका बंद कारखान्याला ही आग लागल्याची माहिती मिळताच तातडीने मडगाव (Margao) अग्निशमन दलाला पाचारण करण्यात आले. अग्निशमन दलाचे जवान तात्काळ घटनास्थळी दाखल झाले आणि त्यांनी अत्यंत कमी वेळात आगीवर नियंत्रण मिळवले. अग्निशमन दलाच्या तत्परतेमुळे कारखान्यातील सुमारे 10 लाख किमतीची मालमत्ता जळून खाक होण्यापासून वाचली. अग्निशमन दलाच्या अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, कारखान्याच्या एका युनिटमध्ये ही आग लागली, ज्यामुळे काही वस्तूंचे आंशिक नुकसान झाले. मात्र, आग इतर भागांत पसरण्यापूर्वीच ती पूर्णपणे विझवण्यात आली.

Nessai Industrial Estate Fire
Sanjivani Sugar Factory Goa: कारखाना बंद करुन शेतकऱ्यांचा छळ करणारं सरकार बहुजन विरोधी- चोडणकर

आगीचे कारण अज्ञात

सध्या आग (Fire) लागण्याचे नेमके कारण अद्याप अज्ञात आहे. अग्निशमन दलाचे जवान आणि पोलीस या आगीच्या कारणांचा सखोल तपास करत आहेत. प्राथमिक तपासणीमध्ये शॉर्ट सर्किट किंवा इतर तांत्रिक बिघाडामुळे आग लागल्याचा अंदाज वर्तवला जात आहे. या घटनेमुळे औद्योगिक वसाहतीमधील इतर कारखानदारांनी मात्र चिंता व्यक्त केली आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa News in Marathi - Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com