Mumbai Goa Highway| Pernem Goa Dainik Gomantak
गोवा

Mumbai Goa Highway:...अन् भीती खरी ठरली, पेडण्यात NH66 वर संरक्षक भिंत कोसळली, कुटुंब थोडक्यात बचावले

Mumbai Goa Highway: संरक्षक भिंत कोसळण्याबाबत विविध वृत्तवाहिन्यांनी वृत्त देखील प्रसारित केले होते.

Pramod Yadav

Mumbai Goa Highway

गोव्यातून सिंधुदुर्गात जाणाऱ्या राष्ट्रीय महामार्ग ६६ (NH66) वर सकाळी संरक्षक भिंत कोसळ्याची एक घटना उघडकीस आली. यावेळी महामार्गावरुन चारचाकीतून प्रवास करणारे एक कुटुंब थोडक्यात बचावले आहे. शनिवारी (दि.२२ जून) सकाळी साडे दहा वाजता ही घटना घडली.

मिळालेल्या माहितीनुसार, गोवा-मुंबई महामार्गावर (Mumbai Goa Highway) पेडण्यातून सिंधुदुर्गात जाण्यासाठी मालपे येथे नवा मार्ग काही महिन्यांपूर्वी खूला करण्यात आला आहे. जुना मार्ग खराब झाल्याने नवा मार्ग तात्काळ खुला करण्यात आला. रस्ताच्या दोन्ही बाजुला असणारे माती आणि चिऱ्यांचे ढीगारे थोपविण्यासाठी संरक्षक भिंत उभारण्यात आली आहे.

दरम्यान, पावसाळा सुरु झाल्यापासून माती व चिऱ्यांचे ढीले झालेले ढीगाऱ्यांचा संरक्षक भिंतीवर ताण येऊन ती कोसळण्याची भीती व्यक्त केली जात होती. याबाबत विविध वृत्तवाहिन्यांनी वृत्त देखील प्रसारित केले होते.

ही भीती आज सकाळी खरी ठरली असून, साडे दहा वाजता माती व चिऱ्यांचे ढीगारे संरक्षक भिंतीवर कोसळले आणि भिंत तूटली. याचवेळी महामार्गावरुन प्रवास करणाऱ्या चारचाकीतील एक कुंटुब थोडक्यात बचावले. (Retaining Wall Collapsed At Pernem, Goa)

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Sudan Attack: सुदान पुन्हा हादरलं! जीव वाचवण्यासाठी पळणाऱ्यांवरच काळाचा घाला; गोळीबारात 8 मुलांसह 24 निष्पाप नागरिकांचा मृत्यू

"बाबर आझमकडे सिक्स मारण्याची क्षमताच नाही...", LIVE मॅचमध्ये मोहम्मद कैफनं काढली लायकी Watch Video

Bicholim Accident: विजयनगर–कारापूर येथे भरधाव कारची पादचारी महिलेला धडक

Viral Video: "लग्न लावून द्या, नाहीतर...!" विजेच्या तारेला लटकणाऱ्या प्रियकराचा थरार; सोशल मीडियावर 22 सेकंदाचा व्हिडिओ तुफान व्हायरल

North Goa Firework Ban: हॉटेल, क्लब अन् बीच शॅक्समध्ये फटाके वाजवल्यास खैर नाही, उत्तर गोव्यात 8 फेब्रुवारीपासून कडक बंदी

SCROLL FOR NEXT