election candidates list Dainik Gomantak
गोवा

Panchayat By-Election Results: सात प्रभागांचा एकाच तासात निकाल; विजयाचे श्रेय आमदारांना

निर्वाचितांकडून विकासकामांची ग्वाही

दैनिक गोमन्तक डिजिटल

Panchayat By-Election Results: राज्यातील सात पंचायतींच्या सात प्रभागासाठी झालेल्या पोटनिवडणुकीचा निकाल झाला. सर्व प्रभागांमध्ये अटीतटीची लढत झाली.

संबंधित पंचायतींच्या तालुका मामलेदार कार्यालयात मतमोजणी सकाळी सुरू होऊन एका तासातच निकाल लागून विजयी उमेदवारांना प्रमाणपत्र देऊन विजयी घोषित करण्यात आले.

या विजयाचे श्रेय उमेदवारांनी आपापल्या मतदारसंघातील आमदारांना दिले. पंचायतीच्या विकासासाठी झटण्याची ग्वाही निवडून आलेल्या उमेदवारांनी दिली.

इतर मागासवर्गियांसाठी राखीव असलेल्या वन मावळींगे कुडचिरे पंचायतीच्या प्रभाग 6 मधून शाहू बोमो वरक (196 मते) निवडून आले. त्यांचे प्रतिस्पर्धी एकनाथ चारी (151) व राजेंद्र नार्वेकर (14) यांना मते मिळाली.

सर्वसाधारण गटातील वेळगे पंचायतीच्या प्रभाग 5 मधून सर्वेश नवसो घाडी (138 मते) विजयी झाले तर महेश गवंडे (36) व साक्षी प्रियोळकर (74) मते मिळाली.

ओर्ली पंचायतीच्या प्रभाग 6 मधून पीटर फर्नांडिस (५४ मते) घेऊन विजयी झाले व त्यांचे प्रतिस्पर्धी इव्हांगेलिस्ता पिमेंता व शिर्ले ब्राझ यांना अनुक्रमे ३८ व २१ मते मिळाली.

राशोल पंचायतीच्या प्रभाग १ मधून फातिमा कार्दोज यांना ११० मते मिळाली तर क्युरोबिनो गोम्स याला ९२ मते मिळाली.

बाळ्ळी अडणे पंचायतीच्या प्रभाग ४ धून हर्षद परीट याला ११८ मते मिळवून विजयी झाले तर त्यांचे प्रतिस्पर्धी प्रशात नाईक (३६), पृथ्वीराज फळदेसाई (५६) तर रोहिदास नाईक (९९) मते मिळाली.

अनुसूचित जमातीसाठी राखीव असलेल्या बार्से - केदे पंचायतीच्या प्रभाग ७ मधून सर्वानंद मोनो वेळीप (२३० मते) यांनी दिनेश वेळीप (१९६) याच्यावर मात केली.

इतर मागासवर्गियांसाठी राखीव असलेल्या काले पंचायत प्रभाग २ मध्ये सूरज नाईक (१४७ मते) याने प्रताप नाईक (१३१ मते) याच्यावर विजय मिळवला.

डिचोलीच्या मामलेदार कार्यालयात वन मावळींगे व वेळगे पंचायतीच्या प्रभागांची मतमोजणी निर्वाचन अधिकारी तथा मामलेदार राजाराम परब यांच्या मार्गदर्शनाखाली झाली. निवडून येताच उमेदवारांनी विजयोत्सव साजरा केला.

सर्वेश घाडी यांनी विजयाचे श्रेय मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांना दिले, तर शाहू वरक यांनी आमदार प्रेमेंद्र शेट यांच्या पाठिंब्यामुळे निवडून आल्याचे सांगितले. पंचायत क्षेत्राचा विकासासाठी झटण्याची ग्वाहीही दोघांनीही दिली.

वेळगे पंचायत (प्रभाग-५)- या प्रभागात २४८ मतदारांनी मतदानाचा हक्क बजावला होता. पैकी एक मत बाद ठरविण्यात आले. विजयी उमेदवार सर्वेश नवसो घाडी यांना १३८ मते पडली.

वन-न-म्हावळींगे पंचायत (प्रभाग-६)- या प्रभागात ३८१ मतदारांनी मतदानाचा हक्क बजावला होता, पैकी २० मते बाद ठरविण्यात आली. विजयी उमेदवार शाहू बोमो वरक यांना १९६ मते मिळाली.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Night Vigil App: तंत्रज्ञानामुळे रात्रीची सुरक्षा होणार अधिक सक्षम, विद्यार्थ्यांनी बनवलेले 'नाईट व्हिजिल' ॲप पोलिसांसाठी नवे हत्‍यार

Jasprit Bumrah Record: 'शतक' नाही, 'त्रिशतक'! जसप्रीत बुमराह बनणार क्रिकेटचा 'ऑल-फॉरमॅट किंग', फक्त 2 विकेट्सची गरज

Ravindra Bhavan Margao: मडगाव रवींद्र भवनातील 'पाय तियात्रिस्‍त' सभागृह पुन्हा खुले, दुरुस्‍तीवर सव्वादोन कोटी खर्च; मुख्यमंत्र्यांनी केले लोकार्पण

Dark Fog In Goa: पहाट ओढून घेतेय दाट धुक्‍याची चादर, सूर्यही उगवतोय विलंबानेच; काजू, आंब्यांच्या झाडांचा मोहोर करपून जाण्याचा धोका

Konkani Drama Competition: साखळीत आजपासून 'कोकणी नाट्य' स्पर्धा, मुख्यमंत्र्यांच्‍या हस्‍ते उद्‌घाटन; सत्तरी, डिचोलीतील 18 मंडळांचा सहभाग

SCROLL FOR NEXT