Canacona Ram Navami 2023: काणकोणात राम नवमीनिमित्त राम रथ यात्रेचे आयोजन; असे असेल नियोजन

काणकोणात बुधवारी (ता.29) श्री राम रथ यात्रा आयोजन समितीतर्फे श्री राम रथ यात्रेचे आयोजन करण्यात आले आहे.
Ram Navami 2023 Goa
Ram Navami 2023 GoaDainik Gomantak

Canacona Ram Navami 2023: काणकोणात बुधवारी (ता.29) श्री राम रथ यात्रा आयोजन समितीतर्फे श्री राम रथ यात्रेचे आयोजन करण्यात आले आहे.

बुधवारी सकाळी 7 वाजता पर्तगाळी मठात श्रीमद विद्याधिश तीर्थ वडेर स्वामींच्या हस्ते श्रीराम मूर्तीची पुजा करून तिची स्थापना रथात करण्यात येणार आहे.

Ram Navami 2023 Goa
Tiswadi Traffic Jam : चोडण फेरीधक्क्यावर वाहनांची कोंडी; प्रवाशांची उडाली तारांबळ

सकाळी 7.30 वाजता पर्तगाळ येथून यात्रेला सुरुवात होणार आहे. त्यानंतर 7.50 वाजता रथयात्रेचे पैंगीण येथील श्री परशुराम देवालय प्राकारात आगमन होईल.

त्यानंतर रथयात्रा मार्गक्रमण करीत पैंगीणचे ग्रामदैवत श्री लक्ष्मीनारायण त्यानंतर माशे येथील श्री निराकार देवालय, 9.30 वाजता लोलयेतील श्री केशव व श्री दामोदर देवालय प्राकारात रथाचे आगमन होईल.

तेथून सकाळी 10.30 वाजता राजबाग येथील श्री विठ्ठल- रूक्मिणी देवालय,त्यानंतर पाटणे येथील श्री देवगी पुरूष देवालय 11.45 वाजता आगोंद येथील श्री आगोंदेश्वर, दुपारी 12.15 वाजता धवलखाजन- आगोंद येथील श्री विठ्ठल -रखुमाई देवालय, 12.45 वाजता मुडकुड- आगोंद येथील श्री लाखणेश्वर देवालयात रथाचे आगमन होऊन त्याठिकाणी महापुजेनंतर महाप्रसाद होणार आहे.

दुपारी 2.15 वाजता गुळे येथील श्री भुमी पुरुष देवालय, 2.30 वाजता चावडी येथील श्री मारूती देवालय, 3 वाजता श्रीस्थळ येथील श्री मल्लिकार्जुन देवालय व परत 4 वाजता रथाचे पर्तगाळी मठ प्राकारात आगमन होऊन यात्रेची सांगता होईल असे समितीने कळविले आहे.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Dainik Gomantak | दैनिक गोमन्तक
dainikgomantak.esakal.com