Dainik Gomantak
गोवा

Bardez Bicholim: बार्देश, डिचोलीत पुढील तीन दिवस मर्यादित पाणीपुरवठा

गोमन्तक डिजिटल टीम

बार्देश, डिचोली तालुक्यात (Bardez And Bicholim) पुढील तीन दिवस मर्यादित पाणीपुरवठा होणार आहे. अस्नोडा येथील जल प्रक्रिया केंद्रात तातडीचे दुरूस्ती काम असल्याने 18 ते 20 ऑगस्ट दरम्यान, बार्देश, डिचोली तालुक्यात मर्यादित पाणीपुरवठा होईल. सार्वजनिक बांधकाम विभागाच्या कार्यकारी अभियंतांने याबाबत अधिकृत सूचना जारी केली आहे. त्यामुळे बार्देश, डिचोली तालुक्यातील नागरिकांना पुढील तीन दिवस पाणी टंचाईचा सामाना करावा लागू शकतो. दोन्ही तालुक्यातील नागरिकांना तीन पाण्याचा जपून वापर करावा लागेल.

दरम्यान, प्रत्येक घराला पाणी पुरवठा करून 100 टक्के 'हर घर जल' प्रमाणित होणारे गोवा पहिले राज्य ठरले आहे. केंदिय मंत्रालयाच्या जल शक्ती खात्याच्या जल जीवन मिशन अंतर्गत गोव्याला हे प्रमाणपत्र मिळाले आहे. अशी माहिती मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांनी दिली आहे. गोवा सार्वजनिक बांधकाम विभागाने प्रत्येक घरी नळाचे पाणी पोहचविण्याचे काम केले असल्याचे सावंत म्हणाले.

गोव्यातील 1 लाख 10 हजार कुटुंबियांना शुन्य पाणी बिल योजनेचा लाभ झाला आहे. असा दावा भाजपच्या वतीने करण्यात आला आहे. गोवा मोफत पाणी योजनेत अंतर्गत अनेक लाभार्थी गोमंतकीयांचा समावेश असून, पाण्याचा वापर देखील कमी झाल्याचे गोवा भाजपने म्हटले आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa Highway: जमिनी गेल्या, रस्ताही अडला; उगवेकरांचा संताप, एनएच 66 मुळे दैनंदिन जीवन विस्कळीत; मोबदल्याची अद्याप प्रतीक्षा

Bicholim Hit And Run Case: सुरक्षेचा 'तिसरा डोळा' ठरला कर्दनकाळ; अपघातानंतर पळणाऱ्या चालकाच्या मुसक्या आवळल्या, डिचोली पोलिसांची कारवाई

"वाघांचे मृत्यू अन् वन विभागाचे अपयश"; पर्यावरणप्रेमी राजेंद्र केरकर यांचा थेट प्रहार!

Goa Crime: काकाची हत्या करून मावशीकडे घेतला आश्रय! बोरी येथील दीपक नाईक हत्या प्रकरणातील संशयित नराधम पोलिसांच्या तावडीत

Goa Accident: अटल सेतूवर विचित्र अपघात! 1 नाही, 2 नाही... 7 गाड्या एकमेकांना धडकल्या, वाहतूक विस्कळीत; Watch Video

SCROLL FOR NEXT