Pravin Arlekar Dainik Gomantak
गोवा

Pravin Arlekar : विकासकामे दर्जेदार करून घेणे ही पंचायतींची जबाबदारी

पेडणेतील गणेश विसर्जनस्थळांचा विस्तार

दैनिक गोमन्तक

मोरजी : पेडणे मतदारसंघातील सर्व पंचायत क्षेत्रांमध्ये असलेल्या जुन्या गणेश विसर्जनस्थळांचे सुशोभीकरण करण्यात येणार आहे. ज्या-ज्या स्थळांचा सरकारच्या निधीतून विकास केला जाईल ते काम उत्कृष्ट दर्जाचे करून घेण्याची जबाबदारी स्थानिक पंचायतींची आहे, असे आवाहन पेडणे मतदारसंघाचे आमदार तथा गोवा हस्तकला महामंडळाचे अध्यक्ष प्रवीण आर्लेकर यांनी कासारवर्णे पंचायत क्षेत्रातील परबवाडा नदीकिनारी भागात गणेश विसर्जन स्थळ दुरुस्ती आणि विस्तारित प्रकल्पाच्या शुभारंभानंतर केले. यावेळी सरपंच सुवर्णा केणी, पंच मंडळी आणि नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

स्थानिक आमदार प्रवीण आर्लेकर यांनी गणेश विसर्जनस्थळाचा विस्तार आणि सुशोभीकरण करण्यास सुरुवात केली आहे. तसेच काम लवकरात लवकर पूर्ण करण्याची हमी यावेळी त्यांनी दिली आहे. कंत्राटदारानेही त्याच पद्धतीने काम करून कामाचा दर्जा राखावा. पंचायतीकडून कामावर लक्ष ठेवले जाईल, असे सरपंच सुवर्ण केणी यांनी सांगितले.

कामाबाबत तडजोड नाही

यापुढे कामाच्या बाबत कधीच तडजोड करणार नाही. ज्या कंत्राटदारांनी कामे घेतलेली आहेत, ती कामे उत्कृष्ट दर्जाची करण्याबरोबरच दिलेल्या मुदतीत पूर्ण करायची आहेत. ज्या पंचायत क्षेत्रात विकासकामे सुरू आहेत त्या कामांवर स्थानिक पंचायतीने बारीक लक्ष ठेवायला हवे. कंत्राटदाराने जर निकृष्ट दर्जाचे काम केले तर त्यांच्यावर कारवाई करण्याचा इशारा यावेळी आमदार प्रवीण आर्लेकर यांनी दिला.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

PM Kisan 24th Installment: दिवाळीपूर्वी शेतकऱ्यांना मोठं गिफ्ट? पीएम किसानचा 24वा हप्ता 'या' दिवशी जमा होणार; पाहा काय आहे अपडेट

VIDEO: समुद्रात तरंगू लागले आयफोन अन् लक्झरी परफ्यूमचे बॉक्सेस! होर्मुझ सामुद्रधुनीत भीषण अपघात; जहाजावरील 21 जणांचा जीव थोडक्यात वाचला

DA Hike: कॅबिनेट बैठकीत DA बाबत मौन! केंद्रीय कर्मचाऱ्यांना आता दिवाळीची प्रतीक्षा; महागाई भत्त्यावर अजूनही सस्पेन्स कायम

Pakistan School Tragedy: निष्पाप चिमुकल्यांचा टाहो! पाकिस्तानात शाळेचे छत कोसळून 20 हून अधिक मुलांचा मृत्यू; हॉस्पिटलबाहेर पालकांचा हंबरडा

Goa Ranji Trophy 2026: बडोद्याकडून पराभवाचा झटका; मोहित रेडकर, दीपराज गावकर यांना गोव्याच्या रणजी संघातून डच्चू!

SCROLL FOR NEXT