Janani Janmabhoomi koul in Goa  Dainik Gomantak
गोवा

जनमन उत्सव सर्वेक्षणाला ग्रामीण भागातूनही प्रतिसाद

केपे मतदारसंघात येणाऱ्या खोल पंचायत परिसरातील महिलांनी या उपक्रमात आवर्जून सहभाग दाखविला.

दैनिक गोमन्तक

मडगाव : महिलांच्या आकांक्षा जाणून घेण्यासाठी ‘गोमन्‍तक’ने हाती घेतलेल्या ‘जनमन उत्सव’ (Janman Utsav survey) सर्वेक्षणाला आता ग्रामीण भागातही उत्तम प्रतिसाद मिळत आहे. केपे मतदारसंघात येणाऱ्या खोल पंचायत परिसरातील महिलांनी या उपक्रमात आवर्जून सहभाग दाखविला.

याच पंचायत क्षेत्रात सुप्रसिद्ध काब द राम हा किल्ला येत असून, या किल्ल्याच्या आसपास राहणाऱ्या महिलांसह नुवे (खोल), गवळ, पपईदांडा, काजूमळ, खारेगाळ, कुडय, पारयेमळ तसेच आमडे साळेरी या भागात हे सर्वेक्षण करण्‍यात आले. गोव्यातील महिलांच्या अपेक्षा काय आहेत, त्यांना भविष्यात गोवा कसा हवा आहे, त्यांच्या समस्या काय, त्यावर कोणते उपाय योजता येणे शक्य आहे.

अशा विविध अंगाने विचार करून एक भक्कम आराखडा तयार करण्याच्या उद्देशाने ‘गोमन्‍तक’ने हे सर्वेक्षण हाती घेतले आहे. या उपक्रमाद्वारे गोव्यातील ३ लाख महिलांची मते नोंदवून घेतली जाणार आहेत. नावेली मतदारसंघात झरीवाडा, रातवाडा, डोंगरी, इंडोना या भागातील महिलांची मते नोंदवून घेण्यात आली असून, या मतदारसंघातील सर्वेक्षण पूर्ण झाले आहे. गोव्यातील चाळीसही मतदारसंघांमध्‍ये जाऊन ‘गोमन्‍तक’ तिथल्या महिलांशी संपर्क साधून त्यांची मते जाणून घेणार आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa Weather Update: वाळपईत पावसाचे ‘शतक’! 2,552 मिमी पावसाची नोंद, मात्र किनारपट्टी भाग अजूनही कोरडाच

Viral Video: तेलाच्या टँकमध्ये पठ्ठ्यानं मारली डुबकी, तरुणाचा कारनामा पाहून लोकांचा चढला पारा; म्हणाले, ''भावा, जरा तरी लाज बाळग!"

Porvorim Development: पर्वरीचा विकास वेगाने; परंपरा आणि आधुनिकतेचा सुंदर संगम! फ्लायओव्हरपासून शेती, आरोग्य आणि क्रीडा सुविधांपर्यंत बदलांचा वेध

Parenting Rules For Children: मुलांना ‘नाही’ म्हणण्याची भीती बाळगू नका; आजची छोटी मर्यादा उद्याची मोठी दुर्घटना टाळू शकते!

Goa Congress: 'गोवा काँग्रेस' नावाला काँग्रेसचा आक्षेप; गिरीश चोडणकरांची गोवा खंडपीठात धाव, निवडणूक आयोगाच्या भूमिकेवर सवाल

SCROLL FOR NEXT