नेव्हल बेस कोचीन ते गोवा नौकानयन मोहिमेस आजपासून प्रारंभ

आझादी का अमृत महोत्सवाच्या निमित्ताने भारतीय नौदल सेलिंग असोसिएशन (आयएनएसए)च्या अंतर्गत कोचीन ते गोवा ऑफशोअर सेलिंग रेगाटा आयोजित केली आहे.
Goa Sailing expeditions start today
Goa Sailing expeditions start todayDainik Gomantak
Published on
Updated on

पणजी: (Goa) आझादी का अमृत महोत्सवाच्या निमित्ताने भारतीय नौदल सेलिंग ( Sailing expeditions) असोसिएशन (आयएनएसए)च्या अंतर्गत कोचीन ते गोवा ऑफशोअर सेलिंग रेगाटा आयोजित केली आहे. सहा भारतीय नौदल नौकानयन जहाजे म्हादई, तारिणी, बुलबुल, नीलकंठ, कदलपुरा आणि हरियाल या स्पर्धेत सहभागी होणार आहेत.

Goa Sailing expeditions start today
मगोपने भाजप युतीला दाखवला ठेंगा

ही मोहीम रविवारपासून (ता. 24) पाच दिवसांच्या कालावधीत होणार आहे. नेव्हल बेस कोचीन ते गोवा अशी ही मोहीम असेल.

नौदल, एएनसी आणि आयएचक्यू एमओडी (नेव्ही)च्या तीन कमांडमधून निवडलेले सहा नौदल कर्मचारी या जहाजांवर तैनात असतील. याशिवाय, यॉटिंग असोसिएशन ऑफ इंडियाशी संलग्न नागरी क्लबचे ओशन यॉट्सदेखील या कार्यक्रमात सहभागी होणार आहेत. या मोहिमेचे आयोजन भारतीय नौदलाच्या ओशन सेलिंग नोड, भारतीय नौदल सेवा मांडवी- गोवा यांच्याकडून केले आहे.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com