Sudin Dhavalikar Dainik Gomantak
गोवा

Bicholim News : 50 मेगावॅट वीजनिर्मितीचा संकल्प

मंत्री ढवळीकर : शिरगावात भूमिगत वीज केबल टाकण्याचे काम सुरू

गोमन्तक डिजिटल टीम

Bicholim News : वीज क्षेत्रात गोवा राज्य स्वयंपूर्ण बनविणे हा उद्देश आहे. विजेसाठी अन्य राज्यांवर अवलंबून न राहता वीज निर्मितीबाबत स्वतंत्र बनणे, हे राज्य सरकारचे धोरण आहे. त्या अनुषंगाने पुढील तीन वर्षांत राज्यात १५० मेगावॅट वीजनिर्मिती करण्यात येणार असल्याची माहिती वीजमंत्री सुदिन ढवळीकर यांनी दिली.

शिरगाव येथे ११ कोटी रुपयांच्या भूमिगत एचटी आणि एलटी वीज केबल टाकण्याच्या कामाचा पायाभरणी सोहळा आज रविवारी संपन्न झाला. यावेळी ते बोलत होते. श्री लईराई देवस्थान सभागृहात आयोजित सोहळ्याप्रसंगी मयेचे आमदार प्रेमेंद्र शेट, वीज खात्याचे मुख्य अभियंते स्टिफन फर्नांडिस, कार्यकारी रामचंद्र मुद्रास, जिल्हा पंचायत सदस्य महेश सावंत, शिरगावच्या सरपंच करिश्मा गावकर, उपसरपंच जयंत गावकर, श्री लईराई देवस्थानचे अध्यक्ष गणेश गावकर आदी उपस्थित होते.

४२ कोटींची कामे मंजूर

वीज खात्यातर्फे मये मतदारसंघात ४२ कोटी खर्चाच्या कामांना मंजुरी मिळाली आहे, अशी माहिती आमदार प्रेमेंद्र शेट यांनी दिली. शिरगाव येथील भूमिगत केबलचे काम श्री लईराई देवीच्या जत्रेपूर्वी पूर्ण करण्यात येणार असल्याचेही त्यांनी सांगितले. विजेच्या बाबतीत राज्य स्वयंपूर्ण बनण्यासाठी मंत्र्यांच्या सहकार्याने प्रयत्न चालू आहेत. विकासकामांसाठी जनतेने सहकार्य करावे, असे आवाहन फर्नांडिस यांनी केले.

नागरिकांना चांगल्या साधनसुविधा उपलब्ध करून देणे, हे सरकारचे कर्तव्य आहे. शाळा, सरकारी इमारती आणि धार्मिक स्थळांवर सोलर बसवून वीज निर्मिती करण्यात येईल. गेल्या एक वर्षात वीज खात्यातर्फे १ हजार ३०० कोटी रुपयांच्या कामांना चालना देण्यात आली आहे.

सुदिन ढवळीकर, वीजमंत्री

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Yemen Saudi Arabia Missile Attack: यमनचा सौदीवर मोठा हल्ला! हवाई अड्डे उद्ध्वस्त, रिफायनरीतून आगीचे लोट; कोट्यवधींचे नुकसान

Talha Saeed Anti India Speech: ''दिल्ली कुणाची होती विसरलात का?" हाफिज सईदच्या लेकानं भारताविरोधात ओकली गरळ; तल्हा सईदच्या रॅलीनं वादंग VIDEO

Goa Ashtami Fair: 'अष्टमी'च्या फेरीने मांडवी किनारा गजबजला! कार्यालये सुटताच गर्दीला उधाण; कपड्यांच्या खरेदीला सर्वाधिक पसंती

India Defence Deal: चीन-पाकिस्तानचा थरकाप उडणार! भारतीय सैन्याची ताकद अनेक पटींनी वाढणार; 1.10 लाख कोटींच्या संरक्षण कराराला मोदी सरकारची मंजुरी

Collared Kingfisher Research: गोव्याच्या किनारी परिसंस्थेसाठी 'कॉलर्ड किंगफिशर'चा अभ्यास! MFG- GBCNचा संयुक्त संशोधन प्रकल्प; पक्ष्याबाबत मिळविणार माहिती

SCROLL FOR NEXT