Goa Crime News Dainik Gomantak
गोवा

Goa Crime News: गोवा पोलीस अॅक्शन मोडमध्ये; अमली पदार्थांच्या तस्करीप्रकरणी एकाला अटक

छाप्यात मनीष महाडेश्वर (44) याला अटक केली आणि त्याच्याकडून 55 लाख रुपयांचे अमली पदार्थ जप्त केले.

दैनिक गोमन्तक

Goa Crime News: गोवा पोलिसांच्या अमली पदार्थ विरोधी पथकाने शनिवारी पहाटे म्हापसामध्ये टाकलेल्या छाप्यात मनीष महाडेश्वर (44) याला अटक केली आणि त्याच्याकडून 55 लाख रुपयांचे अमली पदार्थ जप्त केले.

या छाप्यात 30 किलो गांजा आणि 5 किलो चरस जप्त करण्यात आल्याचे पोलिसांनी सांगितले. तसेच, गुन्हा करण्यासाठी वापरलेली कार आणि सोबतच 50,000 रोख जप्त करण्यात आले आहे.

यावेळी पोलिसांनी सांगितले की, एकाच पोलिसांच्या छाप्यात हा सर्वाधिक जप्त करण्यात आला आहे. काही दिवसांपूर्वी अमली पदार्थ विरोधी पथकाने बार्देश तालुक्यातील गिरी येथे टाकलेल्या छाप्यात 10 लाख रुपये किमतीचा 10 किलो गांजा जप्त केला होता.

म्हापसाचे रहिवासी असलेले संशयित महाडेश्वर अनेक दिवसांपासून एएनसीच्या रडारखाली होते. त्यानुसार सापळा रचून छापा टाकून आरोपीला कारसह राष्ट्रीय महामार्गावरील म्हापसा-पर्वरीजवळ पकडण्यात आले.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, प्राथमिक चौकशीत महाडेश्वरचा आंतरराज्यीय अमली पदार्थांच्या व्यापाराशी संबंध असल्याचे समोर आले आहे. तो कर्नाटकातून गांजा आणि हिमाचल प्रदेशातील डोंगराळ प्रदेशातून चरस आणून गोव्यात विकायचा.

या संपूर्ण छाप्याचे निरीक्षण पोलीस अधीक्षक बॉस्युएट सिल्वा आणि पोलिस उपअधीक्षक नेरलॉन अल्बुकर्क यांनी केले.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Android युजर्ससाठी खूशखबर! WhatsApp चा लूक पूर्णपणे बदलणार; आता तुमच्या फोनमध्येही दिसणार iPhone सारखा स्टायलिश 'फ्लोटिंग बार'!

Goa Postmen: गोव्यातील पोस्टमन 'आऊटसाईडर', 15 वर्षांपासून रोजंदारीवर; कायमस्वरूपी नोकरीसाठी आमदार आमोणकरांना साकडे

Pakistan Minister Video: ''अशी परत जाऊ नकोस''! पाकिस्तानी मंत्र्याचा महिला पत्रकाराची खिल्ली उडवणारा व्हिडिओ व्हायरल; यूजर्सनी घेतलं फैलावर

VIDEO: 'मुंबईचा राजा रोहित शर्मा...' मैदानात चाहत्यांची जोरदार घोषणाबाजी; हिटमॅनची 'ती' खास रिअ‍ॅक्शन कॅमेऱ्यात कैद, व्हिडिओ व्हायरल!

आखाड्यात अनियमित पाणीपुरवठ्याने नागरिक त्रस्त, महिलांची पाण्यासाठी धावपळ; विहिरींचे पाणीही पिण्यायोग्य नसल्यानं नाराजी

SCROLL FOR NEXT