Babush Monserrate, Ashok Phaldesai  Dainik Gomantak
गोवा

Goa BJP: भाजपमधील धुसफूस चव्हाट्यावर; फळदेसाई आणि मोन्सेरात यांच्यात वाद उफाळण्याची शक्यता

Goa Cabinet Reshuffle: बहुमताचे सरकार असतानाही अंतर्गत धुसफूस रोखण्याचे मोठे आव्हान मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांच्यासमोर उभे ठाकले आहे

गोमन्तक डिजिटल टीम

नगरनियोजनमंत्री विश्वजीत राणे आणि महसूलमंत्री बाबूश मोन्सेरात यांच्यातील वाद भाजप प्रदेशाध्यक्ष सदानंद शेट तानावडे यांनी मिटविल्यास आठवडा उलटतोय, तोच कुंभारजुवेचे आमदार राजेश फळदेसाई आणि मोन्सेरात यांच्यात वाद उफाळण्याची शक्यता निर्माण झाली आहे.

राज्य मंत्रिमंडळात फेरबदल होणार, अशी माहिती प्रसारित झाल्यानंतर मंत्रिमंडळ सदस्यांमधील मतभेद प्रकर्षाने चव्हाट्यावर येऊ लागले आहेत. त्यामुळे बहुमताचे सरकार असतानाही अंतर्गत धुसफूस रोखण्याचे मोठे आव्हान मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांच्यासमोर उभे ठाकले आहे.

भाजपने म्हापसा येथे काही दिवसांपूर्वी घेतलेल्या गाभा समितीच्या बैठकीत भूरूपांतर आणि स्थानिक आमदारांना विश्वासात न घेता नगरनियोजन खात्याकडून घेतले जाणारे निर्णय, याविषयी मोन्सेरात यांनी नाराजी व्यक्त केली होती. त्याला राणे यांनी प्रत्युत्तर देताना, आपण आमदारांनी सांगितल्यानुसारच सर्व काही केल्याचे सांगितले.

त्यानंतरही मोन्सेरात यांनी जाहीरपणे नाराजी व्यक्त केली होती. राणे त्यांना प्रत्युत्तर देणार, तेवढ्यात तानावडे यांनी मध्यस्थी करून वादावर पडदा टाकला. नंतर दोन्ही मंत्र्यांनी जणू काही घडलेच नव्हते, अशी सारवासारव केली. तो वाद विस्मृतीत जात असतानाच मंत्री-आमदारांमधील वाद उफाळला आहे.

कचरा प्रकल्पाला विरोध कायम : फळदेसाई

पणजी महापालिका व कचरा व्यवस्थापन खाते मोन्सेरात यांच्याकडे आहे. त्यामुळे बायंगिणी येथील प्रलंबित कचरा प्रकल्पावर विधानसभा कामकाजावेळी ‘तो प्रकल्प होणारच, सर्व परवानग्या मिळाल्या आहेत’, असे त्यांनी सांगितले. मात्र, आमदार राजेश फळदेसाई यांनी या प्रकल्पाला आपला विरोध कायम असल्याचे सांगितले.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Coldrif Cough Syrup Bans: मुलांचा बळी घेणाऱ्या 'त्या' जीवघेण्या कफ सिरपवर गोव्यात बंदी, 'FDA'कडून आदेश जारी

Viral Video: शाळेला दांडी मारुन रस्त्यावर 'आशिकी'! दोन मुलींसोबत रोमान्स करणाऱ्या पठ्ठ्याचा व्हिडिओ व्हायरल; नेटकरी म्हणाले, 'अशा सडकछाप आशिकांनीच...'

IND vs PAK मॅचमधील 'या' घटनेनंतर पाकिस्तानी खेळाडू अडचणीत, ICC च्या नियमांचं उल्लंघन करणं पडलं भारी; काय घडलं नेमकं?

Farmagudi Accident: फार्मागुडी येथे कार आणि दुचाकीचा अपघात, महिला जखमी

Horoscope: आठवडा विशेष: चंद्र राशीनुसार 'प्रेमसंबंध, आरोग्य आणि आर्थिक' स्थिती कशी राहील? सर्व 12 राशींचं भविष्य वाचा

SCROLL FOR NEXT