Goa BJP: 'पक्षापेक्षा कोणी मोठा नाही,' गुपचूप दिल्लीवारी करणाऱ्या मंत्री, आमदारांना गोवा प्रदेशाध्यक्षांचा सज्जड दम!

Goa BJP State President Sadanand Tanawade: मंत्री व आमदारांच्या स्वतंत्र बैठकीत भाजपचे प्रदेशाध्यक्ष सदानंद शेट तानावडे यांनी आमदार व मंत्र्यांना पक्षशिस्तीचे खडेबोल सुनावले.
Goa BJP: 'पक्षापेक्षा कोणी मोठा नाही,' गुपचूप दिल्लीवारी करणाऱ्या मंत्री, आमदारांना गोवा प्रदेशाध्यक्षांचा सज्जड दम!
Goa BJP State President Sadanand TanawadeDainik Gomantak
Published on
Updated on

मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या मंत्री व आमदारांच्या स्वतंत्र बैठकीत भाजपचे प्रदेशाध्यक्ष सदानंद शेट तानावडे यांनी आमदार व मंत्र्यांना पक्षशिस्तीचे खडेबोल सुनावले. दिल्लीवारी करणाऱ्यांनी पक्षशिस्त पाळणे महत्त्वाचे आहे.

सरकार व पक्ष या एकाच नाण्याच्या दोन बाजू आहेत. मंत्री झालो म्हणजे पक्षाचे काही पडून गेलेले नाही अशी वृत्ती खपवून घेतली जाणार नाही.

सरकारमधीलच दुसऱ्या व्यक्तीकडे अंगुलिनिर्देश करणारे वक्तव्य टाळा, अन्यथा त्याची गंभीर दखल घ्यावी लागेल, असा इशारा त्यांनी देण्यास मागेपुढे पाहिले नाही.

दरम्यान, कोणी मंत्री वा आमदार दिल्लीला गेला, त्याची माहिती वर्तमानपत्रांत छापून आल्यानंतरच कळते. पक्ष संघटना व सरकार समांतर चालले पाहिजे.

सरकारमध्ये (Government) काय सुरु आहे याची माहिती पक्षाला हवी. कारण निवडणुकीत पक्षाला जनतेला सामोरे जावे लागते. सरकार भाजपचे आहे. त्यामुळे भाजप जनतेला उत्तरदायी आहे हे लक्षात ठेवावे याकडे प्रदेशाध्यक्ष तानावडे यांनी लक्ष वेधले.

सरकारमधील मंत्र्यांनी कोणाचीही भेट घेण्यासाठी जाताना पक्षाला आणि मुख्यमंत्र्यांना कल्पना द्यावी. ही प्रथा आहे. भाजपात (BJP) आलेल्यांनी पक्षाची ही शिस्त अंगीकारावी. पक्षाच्या शिस्तीबाहेर जाऊ, नये असे या बैठकीत स्पष्ट करण्यात आले आहे.

Goa BJP: 'पक्षापेक्षा कोणी मोठा नाही,' गुपचूप दिल्लीवारी करणाऱ्या मंत्री, आमदारांना गोवा प्रदेशाध्यक्षांचा सज्जड दम!
BJP To Introspect South Goa Defeat: दक्षिणेत पल्लवी धेंपेंचा पराभव का झाला? भाजप कारणांचा शोध घेणार

गुपचूप दिल्लीवारी करणाऱ्यांनी सावध रहावे

सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, पक्षापेक्षा कोणी मोठा नाही. त्यामुळे पक्षाला अंधारात ठेवून गुपचूप दिल्लीच्या वाऱ्या करणाऱ्यांनी सावध रहावे. इतकेच नाही, तर विरोधक बोलतात तसे सरकारच्या विरोधात खोचक बोलणे टाळा. तुमचे प्रश्न सरकारकडे अवश्य मांडा, पण त्याचे भांडवल करण्यापेक्षा ती समस्या सोडवण्यावर भर द्या, अशा शब्दांत तानावडे यांनी आपली नाराजी व्यक्त केली.

Goa BJP: 'पक्षापेक्षा कोणी मोठा नाही,' गुपचूप दिल्लीवारी करणाऱ्या मंत्री, आमदारांना गोवा प्रदेशाध्यक्षांचा सज्जड दम!
Pramod Sawant: 'हा हिंदू समाजाचा अपमान', राहुल गांधींनी माफी मागावी, गोव्याचे मुख्यमंत्री आक्रमक

बैठकीनंतर चर्वितचर्वण

सुमारे अर्धा डझन मंत्री गेल्या काही दिवसांत दिल्लीची वारी करून आले. या बैठकीत काही मंत्र्यांना थेट इशारा देण्यात आला आहे. त्यामुळे बैठकीनंतर काही मंत्री एकमेकांच्या कक्षात बसून बराचवेळ चर्वितचर्वण करण्यात व्यस्त होते. मात्र, या चर्चेचा सारांश समजून आला नाही.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com