SC-ST United Forum Dainik Gomantak
गोवा

SC-ST Reservation: 'एससी, एसटी वर्गीकरण समाजासाठी घातक, सर्वोच्च न्यायालयाने...'

SC-ST United Forum: भारतीय संविधानाने आम्हाला दिलेले आरक्षण हे सामाजिक निकषांवर आधारित आहे, आर्थिक निकषांवर नाही.

गोमन्तक डिजिटल टीम

भारतीय संविधानाने आम्हाला दिलेले आरक्षण हे सामाजिक निकषांवर आधारित आहे, आर्थिक निकषांवर नाही. सर्वोच्च न्यायालयाने जो समाजातील जातींमधील वर्गीकरणाचा तसेच आर्थिकदृष्ट्या सबल असणाऱ्या एसटी, एससी समाजाला आरक्षण न देण्याचा निवाडा दिला आहे त्‍यावर पुनर्विचार होणे आवश्‍‍यक आहे, एससी-एसटी युनायटेड फोरमचे सुभाष केरकर यांनी सांगितले. येथील आझाद मैदानावर ते माध्यमांशी बोलत होते. यावेळी एस. के. जाधव, सतीश कोरगावकर उपस्थित होते.

केरकर म्हणाले, गोव्यात एससी आणि एसटीमध्ये अनेक जाती आहेत. त्यांच्यात वर्गीकरण करण्यात आले तर त्याचा फटका आम्हालाच बसेल. जातीयता कमी होण्याऐवजी अधिक वाढेल. एससी, एसटीचे आरक्षण काढून घेण्याचा हा प्रकार आहे. असल्याचे त्यांनी सांगितले. दरम्‍यान, या आंदोलनाला ओबीसी महासंघाचा पाठींबा असल्याचे मधू नाईक यांनी जाहीर केले.

या आहेत प्रमुख मागण्या

  • केंद्र सरकारने वटहुकूम काढत आरक्षणातील वर्गीकरणाला स्थगिती द्यावी.

  • सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयाविरोधात फेरविचार याचिका दाखल करावी.

  • एससी, एसटी समाजाची सामाजिक शैक्षणिक गणना व्हावी.

  • एससी, एसटी आरक्षणाला संविधानाच्या नवव्या परिशिष्टात समाविष्ट करावे.

  • समाजाच्या विकासासाठी सरकारने ठोस धोरण राबवावे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

IND vs WI 3rd T20I: दुसऱ्या सामन्यातील पराभवानंतर टीम इंडियात मोठा बदल? नमन धीरऐवजी 'या' खेळाडूला मिळू शकते संधी

कामात दिरंगाई केल्यास थेट बडतर्फी! CM सावंत यांचा सरकारी अधिकाऱ्यांना इशारा

Viral Video: सामसूम रस्ता, किर्र अंधार अन् सायकलवरून बाप-लेकीचा प्रवास; अचानक मागून कारची एन्ट्री झाली अन् चालकाने... पाहा व्हिडिओ

Money Laundering Case: 3 कोटींच्या मनी लाँडरिंग प्रकरणात पाच आरोपींवर आरोप निश्चित; 'ईडी'ची कारवाई

Under 19 Cricket: आफ्रिद राजाक्कनावरची नाबाद 82 धावांची खेळी व्यर्थ; गोव्याचा सलग दुसरा पराभव, जम्मू-काश्मीरने 69 धावांनी नमविले

SCROLL FOR NEXT