Goa University Reseach Park: गोवा विद्यापीठात रिसर्च पार्कची स्थापना करण्याचे काम सुरू असून येत्या जानेवारी महिन्यापर्यंत हे रिसर्च पार्क कार्यान्वित होऊ शकते.
तसेच पुढील शैक्षणिक वर्षापासून म्हणजे सन 2024-25 पासून विद्यापीठात जैव-अभियांत्रिकी (Bio-Engg) या विषयातील बीई पदवीचा अभ्यासक्रमास सुरवात होणार आहे. या पदवी अभ्यासक्रमामुळे विद्यापीठाच्या रिसर्च पार्कमधील अनेक उपक्रमांनाही चालना मिळू शकते.
जैव-अभियांत्रिकी अभ्यासक्रमातील BE नंतर पदव्युत्तर आणि डॉक्टरेट अभ्यासक्रमही सुरू केला जाणार आहे, विद्यापीठाचे कुलगुरू हरिलाल बी. मेनन यांनी ही माहिती दिली आहे.
कुलगुरू मेनन म्हणाले की, विद्यार्थ्यांमधील नवोन्मेषाला चालना देण्यासाठी आणि त्यांच्यातील उद्योजकाला प्रवृत्त करण्यासाठी, त्यांच्या कल्पनांचा लाभ घेण्यासाठी, गोवा विद्यापीठाने कॅम्पसमध्ये रिसर्च पार्कची संकल्पना मांडली आहे.
रिसर्च पार्कचा वापर कॅम्पसमधील प्राध्यापक आणि विद्यार्थ्यांपुरता मर्यादित राहणार नाही, तर गोव्यातील कोणताही रहिवासी येथे त्याच्या कल्पना मांडू शकेल.
ते म्हणाले की, रिसर्च पार्कमध्ये बायो, हेल्थ आणि आयटी असे तीन इनक्यूबेटर असतील. अभियांत्रिकी किंवा तंत्रज्ञान पदवी कार्यक्रमाचा एक भाग म्हणून विद्यार्थ्यांना सुरुवातीपासूनच स्टार्टअपमध्ये येण्यासाठी कल्पना मांडता येतील. रिसर्च पार्कमधील इनक्यूबेटर राज्याच्या स्टार्टअप धोरणाला पूरक आणि पाठिंबा देणारे असेल.
आयुर्वेदातील पदव्युत्तर पदवी
कुलगुरू मेनन म्हणाले की, विद्यापीठात आयुर्वेदातील पदव्युत्तर अभ्यासक्रम सुरू करण्याची योजनाही आहे. आम्ही विद्यापीठात संस्कृत, तत्त्वज्ञान आणि इंडिक अभ्यासाची केंद्रे स्थापन केली आहेत आणि आता आयुर्वेदात पीजी प्रोग्राम सुरू करण्यात येणार आहे.
तो संस्कृतमधील सध्याच्या पीजी पदवीसाठई पूरक ठरेल. यातून प्राचीन ज्ञान आणि आधुनिक विज्ञान एकत्र येऊन नाविन्यपूर्ण संशोधन, स्टार्टअपच्या संकल्पना यांना बळ मिळेल.
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.