Goa Cyber Crime: पर्वरीतील युवतीची सव्वा लाख रूपयांची फसवणूक; 'फोन पे'वरून 31 ट्रँझॅक्शनद्वारे लुटले पैसे...

पोलिसांकडून शोध सुरू, युवती मूळची मध्यप्रदेशची
Porvorim Cyber Crime:
Porvorim Cyber Crime: Dainik Gomantak

Goa Cyber Crime: गोव्यातील पर्वरी येथे वास्तव्यास असलेल्या एका तरूणीची सव्वा लाख रूपयांची फसवणूक करण्यात आली आहे. बँक अकाऊंट हॅक करून फोन पे द्वारे 31 ट्रँझॅक्शन्सद्वारे या युवतीच्या बँक खात्यातून 1 लाख 27 हजार 131 रूपये अज्ञाताच्या खात्यात वर्ग करण्यात आले आहेत.

Porvorim Cyber Crime:
Goa Police: बार्देश येथील घरफोडीचा 24 तासांत छडा; परप्रांतीयाकडून 10 लाखाचे सोन्याचे दागिने हस्तगत

आदिती अजय यादव (वय 26) असे या युवतीचे नाव आहे. ती वाडकडे एसबीआय कॉलनी, पर्वरी येथे राहते. ती मूळची कच्छी मोहल्ला, जेल रोड, इंदूर, मध्य प्रदेश येथील आहे. आदिती यादवने तिच्या खात्यातून पैसे गेल्याची तक्रार पर्वरी पोलिसात दाखल केली आहे. पोलिसांनी त्यावरून अज्ञाताविरोधात गुन्हा दाखल केला आहे.

आदिती यादव यांच्या तक्रारीनुसार 10 ऑगस्ट ते 11 ऑगस्ट या काळात त्यांच्या बँक खात्यातून फोन पे मोबाईल अॅपच्या माध्यमातून 1 लाख 27 हजार 131 रूपये इतर खात्यामध्ये वर्ग करण्यात आले. पोलिसांनी या प्रकरणात आयपीसीसह आयटी अॅक्ट अंतर्गत गुन्हा दाखल केला आहे.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com