pole of grade suppressor  Dainik Gomantak
गोवा

दाबोळीतील उड्डाणपुलावर महिला चढल्याने खळबळ; नेमकं काय घडलं?

कुटुंबाने नेण्यास नकार दिल्याने प्रकरणाला वेगळेच वळण

दैनिक गोमन्तक

वास्को: Dabolim Airport जवळ ग्रेड सेपरेटरच्या खांबावर आज सकाळी एक महिला उड्डाणपुलाच्या खांबावर असल्याची काही टॅक्सीचालकांच्या नजरेस पडली. त्यांनी लगेच याची माहिती वास्को पोलिसांना दिली. तसेच अग्निशमन दलालाही पाचारण केले. अग्निशमन दलाच्या जवानांनी सिडी लावून त्या खांबावर बसलेल्या महिलेला खाली उतरण्यास सांगितले. महिला खाली उतरवल्यानंतर तिच्याकडे चौकशी केली असता तिने सांगितले कि, तिला काम मिळेल असे सांगून कोणीतरी येथे आणून सोडले आहे.

(Rescue of a woman at Karwar from the pole of grade suppressor in Dabolim)

तिच्याकडून पैसे काढून घेतल्याचेही तिने सांगितले. ती आपण कारवार येथील असल्याचे सांगितले. तसेच स्नेहा नाईक म्हणून नाव सांगितले. मात्र तिला कुणी आणून सोडले. ती उड्डाण पूलाच्या खांबावर कशी काय चढली हे मात्र तिने सांगितले नाही. वास्को पोलिसांनी तिला ताब्यात घेऊन तिच्याशी चौकशी सुरु केली. ती महिला उड्डाणपुलाच्या खांबावर कशी पोचली ? असा प्रश्न लोकांना पडला आहे संपूर्ण गोव्यात व्हीडीओ व्हायरल झाला असून चर्चेचा विषय बनला आहे.

दरम्यान वास्को पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार त्या महिलेला तीच्या कारवार येथील कुटुंबाने तिथे पाठवू नका असे पोलिसांना सांगितले. सदर कारवार कर्नाटक येथील स्नेहा नाईक हिला वास्को पोलिस स्थानकात ठेवण्यात आल्यानंतर तिला सायंकाळी तिसवाडी शिरदोना येथील सरकारी मनोरुगण इस्पितळात उपचारासाठी दाखल करण्यात आल्याची माहिती वास्को पोलिसांनी दिली.वास्को पोलिस स्थानकाचे उपनिरीक्षक मयूर सावंत यांनी स्नेहा नाईक यांच्या कारवार येथील कुटुंबाला फोन करून स्नेहाला नेण्याची विनंती केली.

स्नेहा नाईक यांच्या कुटुंबाने तिला नेण्यास नकार दिला. उपनिरीक्षक सावंत यांनी अनेक वेळा फोन करून नाईक कुटुंबाला समजावण्याचा प्रयत्न केला पण नाईक कुटुंबाने उपनिरीक्षक सावंत यांना नकारात्मक उत्तरे देऊन स्नेहाला नेण्यास नकार दिला.

पोलीस जनतेची सेवा करण्यासाठी असते पण एखाद्या कुटुंबाने आपल्या घरातील सदस्याला घेण्यास नकार देत असेल तर न्यायासाठी सामान्य जनतेने कोणाकडे जावे ? असा प्रश्न सध्या स्नेहा नाईक यांच्या विषयी पडला आहे. स्नेहा नाईकला शिरदोना येथील सरकारी मनोरुग्ण इस्पितळात दाखल करण्यात आले या प्रकरणी वास्को पोलीस अधिक तपास करीत आहे.

दरम्यान एका टॅक्सी चालकाने दिलेल्या माहितीनुसार सदर उड्डाणपुलाच्या खाली पोकळ भागाकडे जाणारा मॅनहोल बंद करणे आवश्यक असल्याचे म्हटले आहे. जर हे मॅनहोल बंद केले नाहीतर हा पूल अनैतिक व्यवहाराचे साधन बनेल असेल ते म्हणाले, दरम्यान सदर नाट्य पाहण्यासाठी उड्डाण पुलाखाली बध्यांची गर्दी जमली होती.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Karthik Aaryan In Goa: 'रुह बाबा'नं पुन्हा जिंकलं चाहत्यांचं मन; गोव्यात एन्जॉय करतानाचे फोटो केले शेअर!

Winter Care Tips: हिवाळ्यात त्वचेची घ्या विशेष काळजी; 'हे' घरगुती उपाय नक्की ट्राय करा!

Margao Police: हुल्लडबाजांना चाप; मडगाव पोलिसांनी जप्त केल्या मॉडिफाईड बुलेट

South Goa Beach: दक्षिण गोव्यातील समुद्र किनाऱ्यांची धूप वृध्दी सुरुच; राष्ट्रीय अभ्यासातून खुलासा!

Shruti Prabhugaonkar: गोमंतकीयांना कोट्यवधी रुपयांना गंडवणाऱ्या श्रुतीला अवघ्या १० दिवसात जामीन

SCROLL FOR NEXT