Repair work at Karmal Ghat Dainik Gomantak
गोवा

Karmal Ghat: करमल घाटातील त्या धोकादायक वळणावरील अपघात थांबणार? 4 कोटी खर्च करुन बांधणार....

चार कोटींचा खर्च अपेक्षित

दैनिक गोमन्तक

Repair Work at Karmal Ghat: करमलघाटातील तीव्र धोकादायक वळणावर १९ जून रोजी जीवघेणा अपघात घडला.याआधी या वळणावर ९ अपघात घडले आहेत. या पार्श्‍वभूमीवर हे धोकादायक वळण हटवण्याचे कामाला आज (२१ रोजी) प्रारंभ होणार आहे.

या कामासाठी याआधीच निधी मंजूर करण्यात आला होता. गेल्या सप्ताहात सभापती तवडकर यांच्या उपस्थितीत स्थानिक बुधवंत वेळीप यांच्याहस्ते नारळ वाढवून कामाचा शुभारंभ करण्यात आला असला तरी प्रत्यक्षात दि. २१ रोजी, प्रत्यक्ष कामाला सुरुवात करण्यात येईल,अशी माहिती सभापती रमेश तवडकर यांनी दिली.

दरम्यान, १९ जून रोजी, अंधेरी मुंबई येथील मडगाव येथील जिल्हा इस्तपितळात उपचारासाठी दाखल केलेल्या ३ तर बांबोळी इस्पितळात दाखल केलेल्या एका विद्यार्थी पर्यटकाला आज २० रोजी, डॉक्टरांनी घरी जाऊ दिले. तसेच त्या अपघातात मरण पावलेल्या वरुण गांधी (१९) यांचा मृतदेह आज मुंबईहून आलेल्या नातेवाईकांकडे सोपवला. संरक्षक कठडे असते, तर अशी दुर्घटना घडली नसती, असे काणकोण पोलिस निरीक्षक चंद्रकांत गावस यांनी सांगितले.

या धोकादायक वळणावर ९ अपघात झालेले आहेत.

तवडकरांच्या प्रयत्नांमुळे प्रश्‍न मार्गी

रस्त्याच्या कठडा कोसळल्याने व हॉटमिक्स डांबरीकरण केल्यानंतर हा रस्ता अधिक धोकादायक बनला आहे. भूमिपुरुष देवस्थान ते आगोंद जंक्शन पर्यंत दोन्ही बाजूनी दोन -दोन मीटर रस्ता रुंदीकरण करून कठडा बांधला जाईल.

शिवाय तीव्र वळणाजवळ कठडा बांधण्यात येणार आहे. शिवाय खड्डे, बार्सेपर्यंत रस्ता सुरक्षित करण्याचे काम रु. ४ कोटी खर्चून होणार आहे. या कामात काही तांत्रिक अडचणी आल्या होत्या. मात्र सभापती तवडकर यांनी हा प्रश्न धसास लावला, असे सूत्रांकडून सांगण्यात आले.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Sporting Club Goa: दीपांकुर शर्मा यांच्या खांद्यावर मोठी जबाबदारी; आय-लीग 2 मध्ये दमदार कामगिरीचे लक्ष्य

Goa Research: त्वचेच्या उपचारात 3D तंत्रज्ञानाची नवी झेप! स्वस्त आणि सुरक्षित जलजेल विकसित

Colvale Central Jail: कोलवाळ कारागृहात वाईननिर्मितीचा आरोप; प्रशासनाचा स्पष्ट इन्कार, 'सुरक्षा कडक केल्याने नाराजांचे षड्‌यंत्र'

Illegal Hill Cutting Case: 4 वर्षांच्या लढ्याला अखेर यश! हडफडेची बेकायदा कापलेली टेकडी पूर्ववत; हायकोर्टानं प्रकरण काढलं निकाली

Toxic Movie Release: 'टॉक्सिक'चा धमाका! रॉकस्टार यशची रुपेरी पडद्यावर धमाकेदार एन्ट्री; थिएटर्सबाहेर चाहत्यांची तोबा गर्दी VIDEO

SCROLL FOR NEXT