Tourist Car Accident In Calangute  Dainik Gomantak
गोवा

Calangute Accident : कळंगुटमधील भीषण अपघातात 18 वर्षीय युवकाचा उपचारादरम्यान मृत्यू

अपघातातील गंभीर जखमी चालकाला डिस्चार्ज देण्यात आला आहे.

गोमन्तक डिजिटल टीम

TamilNadu Tourist Car Accident In Calangute : कळंगुट-साळगावला जाणाऱ्या रस्त्यावरील डॉल्फिन सर्कलजवळ एका ओव्हर स्पीडिंग स्विफ्ट कारने एका दुभाजकाला धडक दिल्याने शनिवारी अपघात झाला होता. या या अपघातात रघूल (18 ) व कौशिक (19) हे तामिळनाडूमधील दोन पर्यटक गंभीर जखमी होते. त्यांच्यावर गोमेकॉत उपचार सुरू होते.

दरम्यान यातील गंभीर जखमी रघूल (18, तामिळनाडू ) याचा उपचारादरम्यान मृत्यू झाला आहे. तर चालक कौशिक याला रुग्णालयातून डिस्चार्च देण्यात आला आहे.

याबाबत अधिक माहिती अशी की, तामिळनाडूच्या पर्यटकांनी रेंट अ कॅब कार भाड्याने घेतली होती. ते साळगावहून कळंगुटच्या दिशेने येताना कार डॉल्फिन सर्कलजवळ पोहोचताच कारचा टायर फुटला व चालकाचा ताबा सुटून कार दुभाजकास धडकली व तब्बल सहा ते सातवेळा पलटी होऊन दुसऱ्या लेनमधील एका टॅक्सीवर जाऊन आदळली व स्थिरावली.

या अपघातात रेंट अ कारमधील दोघेही पर्यटक गाडीबाहेर फेकले गेले. दोघेही पर्यटक गंभीर जखमी झाल्याने त्यांच्यावर गोमेकॉत उपचार सुरु होते. यातील रघूल (18, तामिळनाडू ) याचा उपचारादरम्यान मृत्यू झाला आहे. तर चालक कौशिक याला रुग्णालयातून डिस्चार्च देण्यात आला आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Railway Diwali Bonus 2026: मोदी सरकारची रेल्वे कर्मचाऱ्यांना दिवाळी भेट, 10 लाखांहून अधिक कर्मचाऱ्यांना मिळणार बंपर बोनस; अखेर कॅबिनेटचा शिक्कामोर्तब

नाशिकच्या पाण्यत आढळले कर्करोगास कारणीभूत ठरणारे जीवघेणे रसायन; पर्यावरण संस्थेच्या अहवालात मोठा खुलासा

Farmers Drought Financial Relief: पावसाने हुलकावणी दिली पण सरकार धावून आले! दिवाळीपूर्वीच शेतकऱ्यांना 'इतक्या' हजारांची मदत जाहीर; वाचा ताजी अपडेट

Unlucky Zodiac Signs: पैशांची घ्या काळजी! शुक्र अस्तामुळे 'या' 4 राशींना बसू शकतो मोठा आर्थिक फटका; पुढील 14 दिवस अत्यंत कसोटीचे

Goa Under 23 Cricket: गोव्याच्या युवा क्रिकेटपटूंचा बडोद्यावर दबदबा! 158 धावांची आघाडी, मोठ्या आघाडीची संधी

SCROLL FOR NEXT