मडगाव : एक तत्वनिष्ठ ज्येष्ठ पत्रकार आणि पुरोगामी विचारवंत सीताराम टेंगसे (85) यांचे आज सकाळी 9.30 च्या वृद्धापकाळाने निधन झाले. प्रदीर्घ पत्रकारीता केलेले टेंगसे हे अल्पकाळासाठी 'दै. राष्ट्रमत'चे संपादकही होते. त्यांच्या मागे पत्नी उल्हासिनी, पुत्र अरविंद, कन्या आणि नातू असा परिवार आहे. आजच दुपारी 4 वाजता त्यांच्यावर मडगाव स्मशानभूमीत अंत्यसंस्कार करण्यात येणार. (Sitaram Tengse Passed Away News Updates)
काही दिवसांपूर्वी त्यांची प्रकृती खालावल्याने त्यांना मडगावातील (Margaon) एका खासगी इस्पितळात उपचारासाठी दाखल करण्यात आले होते. तिथेच उपचार चालू असताना आज सकाळी त्यांचे निधन झाले. त्यांच्या निधनावर विरोधी पक्षनेते दिगंबर कामत (Digambar Kamat) यांनी दुःख व्यक्त केले आहे
मूळ शेळी - लोलये (काणकोण) येथील सीताराम टेंगसे हे सुरवातीला अध्यापनाचे काम करायचे. सुरवातीला त्यांनी काणकोण (Canacona) येथील निराकार विद्यालयात तर नंतर मडगाव येथील दामोदर विद्यालयात अध्यापनाचे काम केले.
1965 साली मडगावात 'गोमंतवाणी' हे दैनिक सुरू केल्यावर ते त्या वृत्तपत्रात रुजू झाले. त्या क्षणापासून त्यांनी घेतलेले पत्रकारितेचे (Journalist) व्रत त्यांनी शेवटपर्यंत पाळले. त्यानंतर 'दै. राष्ट्रमत'मध्ये ते सुरवातीला सहसंपादक म्हणून रुजू झाले. त्यानंतर कार्यकारी संपादक व नंतर स्व. चंद्रकांत केणी यांनी राष्ट्रमत मधून निवृत्ती स्वीकारल्यावर शेवटच्या तीन वर्षांसाठी त्यांनी या वृत्तपत्राचे संपादकपदही सांभाळले.
आपल्या शैलीदार अग्रलेखासाठी प्रसिद्ध असलेले टेंगसे हे सामाजिक कार्यातही सक्रिय होते. मडगावातील गोमंत विद्या निकेतन या संस्थेचे ते क्रियाशील कार्यकर्ते होते. समता आंदोलन, अंधश्रद्धा निर्मूलन आदी चळवळीतही त्यांचा सक्रिय सहभाग होता. एक ध्येयवादी पत्रकार म्हणून त्यांची जनमानसात प्रतिमा होती.
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.